31 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेष'मोदी, योगी यांचे नाव घेण्यासाठी दबाव होता!'

‘मोदी, योगी यांचे नाव घेण्यासाठी दबाव होता!’

मालेगाव स्फोटातून निर्दोष ठरलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी २००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर रविवारी भोपालमध्ये भव्य स्वागत झाल्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली.

त्या म्हणाल्या की, “मालेगाव स्फोट काँग्रेसने रचलेली कटकारस्थाने होती आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.”

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, भगवा दहशतवादाचा आरोप हा हिंदूंना बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव होता. “हा निकाल हा देशविरोधक आणि गद्दारांच्या चेहऱ्यावर काळं फासणारा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसने मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणासाठी हिंदूंवर खोटे आरोप लावले व त्यांना तुरुंगात डांबले, असं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

कृषी योद्धा : शाजी के. व्ही.

कधी काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला, आता भाजपाचा भक्कम गड

ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?

कावड यात्रेदरम्यान वाद, सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या!

मालेगाव स्फोट प्रकरण:

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये मोटारसायकलला बाँब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यात सहा जण ठार झाले व सुमारे १०० जण जखमी झाले होते. १७ वर्षांनी, विशेष एनआयए न्यायालयाने पुरावा अभावामुळे साध्वी प्रज्ञा व इतर सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींशी हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला होता.

मोदी व योगींचं नाव घेण्यासाठी दबाव

साध्वी प्रज्ञा यांनी असा आरोप केला की, तपास यंत्रणांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं जबरदस्तीने घेण्यासाठी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. त्या म्हणाल्या, “माझ्यावर मोठ्या व्यक्तींची नावं घेण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला. पण मी मोडले नाही. कोणालाही खोटं फसवले नाही. म्हणून मला खूप छळ सहन करावा लागला.”

साध्वी प्रज्ञा यांचा संदेश:

त्या म्हणाल्या की, सत्य आणि धर्म नेहमी जिंकतो. “सत्य आमच्याकडे होतं. धर्म आमच्याकडे होता. हा निकाल त्याचा पुरावा आहे,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा