24 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरविशेषकोल्हापूरच्या मुलीची कमाल; लष्करात प्रवेश करणारी पहिली महिला

कोल्हापूरच्या मुलीची कमाल; लष्करात प्रवेश करणारी पहिली महिला

जाधव कुटूंबाची चौथी पिढी

Google News Follow

Related

कोल्हापूरची सई जाधव (वय २३) हिने इतिहास रचत देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी होण्याचा मान पटकावला आहे. तिने हा टप्पा पूर्ण केल्यामुळे ९३ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. १९३२ मध्ये अकॅडमीची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत ६७,००० हून अधिक अधिकारी कॅडेट्स येथून उत्तीर्ण झाले, मात्र यामध्ये एकही महिला नव्हती. सईमुळे आता हा इतिहास बदलला आहे.

सईच्या कुटूंबात लष्कराचा प्रदीर्घ वारसा राहिलेला आहे.  तिचे- पणजोबा ब्रिटिश आर्मीत कार्यरत होते, आजोबांनी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावली, तर वडील संदीप जाधव आजही सैन्यात कार्यरत आहेत. सईने लष्करात केलेल्या प्रवेशामुळे जाधव कुटुंबातील ही चौथी पिढी ठरली आहे.

सईला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर कमिशन देण्यात आले असून, आयएमए मधून टेरिटोरियल आर्मीमध्ये सामील होणारी ती पहिली महिला अधिकारी ठरली आहे. यापूर्वी या शाखेत महिलांचा समावेश झाला असला, तरी आयएमएमधून ही कामगिरी करणारी सई पहिलीच आहे.

पासिंग-आऊट परेडदरम्यान सईच्या पालकांनी तिच्या खांद्यावर स्टार लावतानाचा क्षण हा अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ठरला.

सईच्या या यशाची चर्चा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झपाट्याने पसरली. अनेक माजी सैन्याधिकाऱ्यांनी हा क्षण शेअर करत त्याचे कौतुक केले.

अनेकांनी या घटनेला भावी पिढ्यांतील मुलींना प्रेरणा देणारा हा मैलाचा दगड असे संबोधले, तर काहींनी हे यश भारतीय सेनेतील वाढत्या उत्कृष्टतेचे प्रतीक असल्याचे म्हटले.

सशस्त्र दलातील महिलांसाठी नवा मार्ग

सध्या भारतीय सेनेत ८ महिला अधिकारी कॅडेट्स प्रशिक्षण घेत आहेत. या महिला २०२२ च्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) प्रवेशातून निवड झालेल्या पहिल्या तुकडीतील आहेत.

हे ही वाचा:

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर काय ?

घाऊक महागाई दर -०.३२ टक्के

मणिपूर : राज्यपालांचे ड्रोन, एआय टूल्सद्वारे निगराणीचे आदेश

ईडीकडून मालब्रोस इंटरनॅशनलची मालमत्ता जप्त

सई जाधवचा आयएमए मधील प्रवेश विशेष परवानगीद्वारे झाला. त्यानंतर तिने ६ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले.

हे प्रशिक्षण पुरुष कॅडेट्ससोबतच, समान निकष आणि मानकांनुसार पार पाडण्यात आले. सईचे शिक्षण बेळगावपासून सुरू झाले आणि वडील संदीप जाधव यांच्या लष्करी बदलीमुळे विविध राज्यांमध्ये पुढे चालू राहिले.

पदवी पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड पर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला. त्या निवड प्रक्रियेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिला इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश मिळाला.

अनेक इच्छुक उमेदवारांसाठी हे यश नवीन मार्ग, संधी उपलब्ध करून देऊ शकतात याचा हा पुरावा आहे.

जून २०२६ मध्ये, ही नवनियुक्त अधिकारी चेटवुड बिल्डिंगसमोर होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणार आहे. हा सन्मान फक्त आयएमए मधून उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनाच मिळतो. सशस्त्र दलांमधील बदलत्या संधींचे हे आणखी एक ठळक प्रतीक ठरेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा