तब्बल २५६ कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत केमिकल पुरवठादाराला अटक केली आहे. क्राईम ब्रांचचा दावा आहे की, हा आरोपी मुस्तफा आणि ताहिर डोला यांना ड्रग्स तयार करण्यासाठी रसायनांचा पुरवठा करत होता. हे प्रकरण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात सापडलेल्या ड्रग्स फॅक्टरीशी संबंधित आहे. मुंबई क्राईम ब्रांचने आरोपीला गुजरातमधून अटक केली असून, त्याची ओळख ३४ वर्षीय ब्रिजेश म्हणून झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ब्रिजेशच डोला आणि कुब्बावाला यांना सिंथेटिक ड्रग्स तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचा आणि कच्च्या मालाचा पुरवठा करत होता.
सध्या आरोपी ब्रिजेशला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या काळात कठोर चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात एक ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी उघडकीस आली होती. क्राईम ब्रांचने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर छापा टाकत या फॅक्टरीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे, तसेच १२६.१४ किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २५६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा..
पाकिस्तानी पासपोर्ट अजूनही सर्वात दुर्बल
RSS ची अधिकारी असल्याचे सांगत महिलेचा भाजप नेत्याला ४१ लाखांचा गंडा!
जो लालचामुळं धर्मांतर करतो, तो देशही विकू शकतो
लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण : सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती
ताहिर डोला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम याचा मुलगा, तर मुस्तफा त्याचा भाचा आहे. मुस्तफाला संयुक्त अरब अमिरात (UAE) येथून अटक करून भारतात आणण्यात आले होते, तर ताहिर डोला यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सलीम दाऊदच्या भारतातील ड्रग्स तस्करी नेटवर्कच्या मुख्य सर्कलचा भाग आहे. या बेकायदेशीर व्यवहारात सलीमचा मुलगा ताहिर आणि भाचा मुस्तफा त्याला सक्रिय मदत करत होते, त्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आले. सलीम डोला याचं नाव यापूर्वीही ड्रग्स प्रकरणात समोर आलं होतं, जेव्हा मुंबई क्राईम ब्रांचच्या अँटी नार्कोटिक्स सेलने सांताक्रुजमध्ये १०० किलो फेंटानिल ड्रग्स जप्त केलं होतं. मात्र सांगली प्रकरणात सलीम सध्या फरार आहे.







