25 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरविशेषपुण्यात सरफराजच्या वादळासमोर राजस्थान गारद

पुण्यात सरफराजच्या वादळासमोर राजस्थान गारद

Google News Follow

Related

सय्यद मुस्ताख अली ट्रॉफी स्पर्धेत आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी सरफराज खानने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली दावेदारी ठसठशीतपणे मांडली आहे. राजस्थानविरुद्ध अवघ्या २२ चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी करत सरफराजने मुंबईला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने निर्धारित २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या.

राजस्थानकडून

  • मुकुल चौधरी — २८ चेंडूंत ५४ धावा (३ षटकार, ४ चौकार)

  • दीपक हुड्डा — ३१ चेंडूंत ५१ धावा (३ षटकार, ४ चौकार)

  • रामनिवास गोलाडा — २९ चेंडूंत ४८ धावा

  • महिपाल लोमरोर — २४ चेंडूंत ३९ धावा

२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला चौथ्या षटकाच्या अखेरीस यशस्वी जैस्वाल (१५ धावा) बाद झाल्याने धक्का बसला. मात्र त्यानंतर मैदानावर अवतरलेला सरफराज खान म्हणजे जणू वादळच!

अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सरफराजने राजस्थानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
सरफराजने २२ चेंडूत ७ षटकार आणि ६ चौकारांसह ७३ धावा ठोकल्या. विशेष म्हणजे, त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक झळकावत टी-२० कारकिर्दीतील आपले सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. रहाणेसोबत दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची तडाखेबंद भागीदारी करत त्याने विजयाचा पाया रचला.

अजिंक्य रहाणे — ४१ चेंडूत ७२* धावा (३ षटकार, ७ चौकार)
अथर्व आंकोलेकर — ९ चेंडूत २६ धावा (३ षटकार, १ चौकार)

मुंबईने १८.१ षटकांत ७ बाद २१७ धावा करत सामना आपल्या नावावर केला.
मागील आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सरफराजसाठी ही खेळी आयपीएल २०२६ मिनी लिलावाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा