येत्या ४ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला हिरवा कंदिल दाखविल्यामुळे गेले दीड-पावणे दोन वर्षे बंद असलेल्या शाळा आता मुलांच्या किलबिलाटाने भरून जातील असे दिसते आहे. पण कुठले वर्ग, कोणत्या इयत्तेतील मुलांसाठी शाळा उघडणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही.
याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणतात की, ७ जुलै २०२१ला जीआर काढला होता. ग्रामीण भागात ८ वी ते १२वी शाळा सुरू करणार होतो. १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. ८ वी १०वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १० ऑगस्टला शासननिर्णय निर्गमित केला होता. तिसऱ्या लाटेबाबत चर्चा होती. म्हणून आम्ही टास्क फोर्सशी चर्चा केली. बैठका झाल्या. शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा केली. एसओपीत बदलाच्या सूचना आल्या. मुले, पालक, शिक्षक यांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. ७ जुलै, १० ऑगस्टला घेण्यात आलेले निर्णय, टास्क फोर्सच्या सूचनांनुसार शाळा सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात ५वी ते १२वी आणि ८ वी ते १२वी शहरी भागात शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू होणार.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असतानाही वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. राज्याची शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शाळा सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. सर्वप्रकारच्या उपाययोजना अमलात आणून, मुलांच्या सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करता येतील, असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पालक संघटनेची मात्र वेगळी भूमिका समोर आली आहे. सर्व मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नसताना शाळा कशा सुरू करता येतील, असा सवाल पालक संघटनेच्या सहाय यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे कॉलेज सुरू नाहीत मग शाळा कशा सुरू करता येतील, असा सवालही सहाय यांनी विचारला आहे.
हे ही वाचा:
भारतीय हवाई दलात लवकरच येणार एअरबस
‘केंद्र सरकारने जे केले ते कोणताही देश करू शकत नाही’
दिल्लीत ‘या’ कोर्टात का झाला गोळीबार?
भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित
बच्चू कडू म्हणाले की, अनेक संघटनांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात मागणी केलेली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.







