24 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरविशेषशीतल कारुळकर यांना वूमेन्स अचिव्हर्स पुरस्कार

शीतल कारुळकर यांना वूमेन्स अचिव्हर्स पुरस्कार

Google News Follow

Related

सामाजिक कार्यात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल जोशी कारुळकर यांना अभ्युदय वात्सल्यमच्या वतीने वूमेन्स अचिव्हर्स ऍवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला हा पुरस्कार वितरण सोहळा आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे पार पडणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल.

कारुळकर प्रतिष्ठानची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतानाच शीतल कारुळकर यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. शीतल कारुळकर यांनी ग्रामीण भागात, आदिवासी पाड्यांमध्ये सामाजिक कार्य केले आहे. पर्यावरण संरक्षण, मुलांना शिक्षणासाठी मदत आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी भरपूर परिश्रमही घेतले आहेत. त्यांच्या या वाटचालीची दखल घेऊन अभ्युदयने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले.

५ एप्रिलला आयटीसी परळ येथे होत असलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रमुख अतिथी यूपीएल लि.चे चेअरमन पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिरानंदानी समुहाचे निरंजन हिरानंदानी, एचडीएफसी म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत मुनोत, एल अँड टी फायनान्स होल्डिंग लि.चे चेअरमन शैलेश हरीभक्ती, आर्कफिन ग्रुपचे संचालक प्रशांत कारुळकर, सॅनफ्रॅन ग्रुपचे संतोष मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.

हे ही वाचा:

पाकिस्तानची संसद बरखास्त, ३ महिन्यांत पाकिस्तानमध्ये निवडणुका

गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा

काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ

शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर

 

शीतल कारुळकर यांच्यासह विविध क्षेत्रात अग्रणी असलेल्या १४ महिलांना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. त्यात अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रिती अदानी, राज्यमंत्री आदिती तटकरे, एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीरजा बिर्ला, मेट्रोपोलिस लॅबच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शहा, एडलगिव्ह फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्या शहा, – प्रतिष्ठित शास्त्रीय गायक पद्मश्री डॉ. सोमा घोष, भावना दोशी असोसिएट्स एलएलपी च्या संस्थापक भागीदार भावना दोशी, निष्णात वकील अॅड. आभा सिंग,  मुख्य कार्यकारी अधिकारी द अकॅडमी स्कूल डॉ. मैथिली तांबे, कायनेटिक ग्रीन एनर्जीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया, ब्लूमबर्ग क्विंट येथे व्यवस्थापकीय संपादक, मेनका दोशी,  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आयएएस निधी चौधरी, आरव ग्लोबल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रीना तिवारी यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा