26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषअटल सेतूवरून धावणार एसटीची शिवनेरी

अटल सेतूवरून धावणार एसटीची शिवनेरी

पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर अशा दोन मार्गावर उद्यापासून एसटीची सेवा

Google News Follow

Related

एसटी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बस उद्यापासून धावणार आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून पुणे ते मंत्रालय, स्वारगेट ते दादर या दोन मार्गावरून शिवनेरी उद्या, मंगळवारी मार्गस्थ होणार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा देशात उत्साहात साजरा होत असतानाच एसटी महामंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. उद्या, २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन ते मंत्रालय (सकाळी ६.३०) व स्वारगेट ते दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस धावणार आहे.

शिवनेरी बस पुणे येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत ११ व दुपारी एक वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकीट दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्याचे आरक्षण एसटी महामंडळाच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲपवर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

हेही वाचा :

नॅशनल कॉन्फरन्सनंतर पीडीपीही ‘इंडिया’तून बाहेर

६०० गायींची कत्तल, होम डिलिव्हरी, अलवरच्या बीफ मार्केट मधील खुलासा!

अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’

प्रवासाचा वेळ तासाभराने कमी
अटल सेतूवरून मुंबईतून निघालेली बस अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणार आहे. चिर्लेहून ६० किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. अटल सेतूच्या मार्गाने पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी आहे. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरून मार्गस्थ झाल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी होईल, असा अंदाज आहे.

तिकीट दरात कोणताही बदल नाही
शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून २५० रुपये टोल आकारला जातो. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट वाढणार का? हा प्रश्न अपेक्षित होता. परंतु, एसटी महामंडळाने अटल सेतूवरुन धावणाऱ्या शिवनेरी बसेससाठी तिकीट दरात कोणताही बदल केलेला नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा