उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका तरुणीला गोळ्या झाडण्याची घटना घडली आहे. सकाळी घरातून मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या तरुणीवर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. सद्यस्थितीत तिची प्रकृती चिंताजनक असून, तिला सैफई पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मैनपुरी पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मैनपुरीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला चौथियाना येथे घडली. तरुणी सकाळी घराजवळील राणी मंदिरात पूजा करण्यासाठी गेली होती. आरोप आहे की त्याच मोहल्ल्यात राहणाऱ्या राहुल दिवाकर (पुत्र रतन दिवाकर) नावाच्या तरुणाने रिव्हॉल्वर घेऊन मंदिरात प्रवेश केला. त्याने मंदिराचे गेट आतून बंद केले आणि शिवलिंगाची पूजा करत असलेल्या तरुणीवर गोळ्या झाडल्या.
राहुलने तिच्यावर चार गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून परिसरातील लोक धावत आले, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. माहिती समोर आली आहे की आरोपी राहुल दिवाकर त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला सैफई पीजीआय येथे हलवण्यात आले आहे.
हेही वाचा..
धर्मांतर प्रकरणात छांगूरच्या पुतण्याच्या घरावर बुलडोजर
आग्रा धर्मांतर प्रकरण : डेहरादूनच्या युवतीचे धक्कादायक खुलासे
तैवानच्या सीमेवर चीनची लष्करी विमानं!
कंबोडियाच्या भारतीय दूतावासाने काय दिलाय सल्ला ?
मैनपुरी शहराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) अरुण कुमार यांनी सांगितले की, “कोतवाली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात एक तरुणी गोळीबारात जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती गंभीर असल्याने सैफई पीजीआयला रेफर करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, “प्रारंभीच्या तपासातून असे समोर आले आहे की गोळी झाडणाऱ्या तरुणाचे तरुणीशी पूर्वी संभाषण व्हायचे. कोणत्यातरी वादातून त्याने हे कृत्य केले असावे. पोलिसांनी सांगितले की आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.







