इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क रामप्रकाश यांना विश्वास आहे की, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल लवकरच ‘फॅब फोर’ (विराट कोहली, जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन) मध्ये स्थान मिळवू शकतो.
गिलने नुकत्याच कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्म दाखवत लीड्समध्ये १४७ आणि ८, तसेच एजबेस्टनमध्ये २६९ आणि १६१ धावा केल्या. यामुळे त्याने मालिकेच्या तीन सामन्यांतच ५८५ धावा फटकावल्या आहेत.
‘द गार्डियन’मध्ये लेख लिहिताना रामप्रकाश म्हणाले, “फक्त त्याच्या स्किल आणि रन मशीन होण्याच्या भुकेचं कौतुक न करता, त्याच्या नेतृत्वगुणांचंही अभिनंदन झालं पाहिजे. अनेकदा कर्णधारपद खेळाडूच्या कामगिरीवर परिणाम करतं, पण गिलसाठी ते प्रेरणादायी ठरलंय.”
ते पुढे म्हणाले, “फॅब फोरच्या युगाचा शेवट जवळ आलाय. आता अशा फलंदाजांची गरज आहे, जे ही पोकळी भरून काढतील. गिलने हे स्पष्ट दाखवून दिलंय की, तो ही जबाबदारी पार पाडू शकतो – तेही पारंपरिक शैलीत.”
हेही वाचा:
“न्यूझीलंडला धक्का! फिन अॅलन त्रिकोणी मालिकेबाहेर
राहुल गांधी पिकनिकसाठी आले आणि निघून गेले
छांगुर बाबा प्रकरणात ईडीकडून तपास
IndVsEng Test Series : लॉर्ड्स कसोटी सामन्यात पुनरागमनासाठी जसप्रीत बुमराह सज्ज
रामप्रकाश यांनी असेही नमूद केलं की, इंग्लंडने दोन्ही सामन्यांत टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आणि त्यामुळे गिलला सामन्यावर पकड मिळवता आली. त्यांनी इंग्लंड संघाला सल्ला दिला की, उर्वरित सामन्यांमध्ये गिलसाठी नवीन रणनीती आखाव्यात, कारण तो त्यांच्या गोलंदाजांच्या शैलीशी आता परिचित झाला आहे.







