उत्तर प्रदेशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. गोरखपूरमध्ये ‘एकता यात्रा’ कार्यक्रमाला संबोधित करताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, वंदे मातरम हे गाणे म्हटल्याने नागरिकांमध्ये भारत माता आणि मातृभूमीबद्दल आदर आणि अभिमानाची भावना निर्माण होईल. वंदे मातरम् या गीताबद्दल आदराची भावना असली पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेत ते गायन अनिवार्य करू, असे पीटीआय वृत्तसंस्थेने योगी आदित्यनाथ यांच्या हवाल्याने म्हटले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमात असेही म्हटले की, आमचे कर्तव्य आहे की जाती, प्रदेश, भाषेच्या नावाखाली फूट पाडणाऱ्या आणि नवीन जिना निर्माण करण्याच्या कटाचा भाग असलेल्या घटकांना ओळखणे. भारतात पुन्हा कधीही नवा जिना निर्माण होणार नाही याची खात्री आपण केली पाहिजे. फुटीरतावादी हेतू मूळ धरण्यापूर्वीच तो गाडून टाकला पाहिजे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये सांगितले.
हे ही वाचा:
गुजरातनंतर फरिदाबादेत ३०० किलो आरडीएक्ससह डॉक्टर सापडला
चीनमध्ये डॉक्टर झालेला कट्टर इस्लामी भारतीयांवर करणार होता विषप्रयोग
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; भाजपाची सिद्धरामय्या सरकारवर टीका
अमेरिकन व्यक्तीला २,००० डॉलर्स मिळणार!
१९३७ मध्ये ‘वंदे मातरम’चे महत्त्वाचे श्लोक वगळण्यात आले होते, ज्यामुळे फाळणीची बीजे पेरली गेली, असा आरोप शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसकडून माफी मागण्याची मागणी केली जात आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, अशी विभाजनकारी मानसिकता अजूनही देशासाठी एक आव्हान आहे. गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त “वंदे मातरम्”च्या वर्षभराच्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी हे भाष्य केले होते. ऐतिहासिक संदर्भांनुसार, वंदे मातरम हे प्रथम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंगदर्शन मासिकात प्रकाशित केले होते आणि १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ते गायले होते.







