22 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषतीन दशके एकही अपघात न करता चालविली एसटी

तीन दशके एकही अपघात न करता चालविली एसटी

महाराष्ट्रातल्या सहा चालकांचा गौरव; ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्जचा उपक्रम

Google News Follow

Related

सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) ने आज नवी दिल्ली येथे ‘हिरोज ऑन द रोड’ असा पुरस्कार देवून ४२ चालकांचा सत्कार केला. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी त्यांच्या विनाअपघात, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमासाठी देशभरातील ४२ चालकांना त्यांच्या कुटुंबीयांसह सुरक्षा पुरस्कार प्रदान केले. यामध्ये पहिल्या १७ चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता ३० वर्ष सेवा दिल्याची नोंद आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा चालकांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. घोडके किसन रामभाउू (३६ वर्ष अपघातमुक्त सेवा) आणि मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार मुल्ला (२९ वर्ष अपघातमुक्त सेवा) अशी या गुणवंत चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवंड (२६ वर्ष अपघातमुक्त सेवा) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील आवटे राजेंद्र महादेव (२५ वर्ष अपघातमुक्त सेवा), पुणे महानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (२४ वर्ष अपघातमुक्त सेवा), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (२१ वर्ष अपघातमुक्त सेवा) यांचा आज गौरव करण्यात आला.

सध्या, महानगरपालिका अंतर्गत ८० राज्य मार्ग परिवहन उपक्रम हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत जे संयुक्तपणे अंदाजे दीड लाख बस चालवतात आणि सुमारे ७० दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्याने मुख्यत्वे सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणा घडवून आणत आहे.

हे ही वाचा:

अतिक -अशरफ च्या तीन मारेकऱ्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

उत्तर प्रदेशातले नामचीन गुंड अतीक – अश्रफ बीडमध्ये ठरले ‘शहीद’

धक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात

मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने थोपटले दंड

शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्ही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन दक्षता, यावर आधारित रस्ता सुरक्षेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मंत्रालयाने संबंधित संस्था आणि भागधारकांसह एक बहु-आयामी धोरण तयार केले आहे. एसआरटीयूच्या गाड्यांसंदर्भात रस्ते अपघातांचे प्रमाण खूपच कमी आहे (०.०९ अपघात दर) काही एसआरटीयूने शहरी वाहतुकीमध्ये सरासरी ०.०९ (हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू – सेलम, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार आणि दिल्ली) पेक्षा खूपच कमी अपघात दर आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना पुढील प्रमाणे :
अ. चालकासंबंधित
१. भर्तीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे.

२. निवडलेल्या चालकांना भर्तीच्या वेळीच प्रशिक्षण देणे आणि अद्यतन प्रशिक्षण देणे.

३. प्रोत्साहन देण्यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे.

ब. वाहन संबंधित

१.वेळापत्रकानुसार बसची देखभाल करणे आणि ब्रेक, स्टीयरिंग, हेडलाइट्स, टायर इत्यादी सुरक्षेशी संबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे.

२. चालकाच्या आसनाचे ‘अर्गोनॉमिक डिझाइन’

३. नेहमी वाहनाच्या दुरूस्तीची खात्री करणे.

क. कार्याचे वेळापत्रक

१. कामाचे वेळापत्रक आणि चालकांना योग्य विश्रांतीच्या अंतरासह रोस्टर पद्धतीने काम

२. सर्व सुविधांसह कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृहे

ड. प्रोत्साहनपर उपाय

१. वर्षातून किमान एकदा सर्व चालकांसाठी अद्यतन प्रशिक्षण कार्यक्रम सुनिश्चित करणे.
२. डेपो, प्रदेश, विभाग आणि राज्य स्तरावर अपघातमुक्त सेवा चालकांना रोख पुरस्कार आणि प्रमाणपत्रे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा