दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’

उपांत्य फेरीत पराभव; विक्रम अधिकच खराब

दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’

LAHORE, PAKISTAN - MARCH 05: David Miller of South Africa leaves the field after losing the ICC Champions Trophy 2025 semi final between South Africa and New Zealand at Gaddafi Stadium on March 05, 2025 in Lahore, Pakistan. (Photo by Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images)

दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा ‘चोकर्स’ ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ५० धावांनी पराभव झाला. यामुळे आयसीसी नॉकआउट सामन्यांमधील दक्षिण आफ्रिकेचा पराभवाचा सिलसिला कायम राहिला. डेव्हिड मिलरच्या वेगवान शतकानंतर न्यूझीलंडने दिलेले ३६३ धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसाठी डोंगराएवढं ठरलं.

 

दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणजे मोक्याच्या क्षणी गटांगळ्या खाणारा संघ म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेला ‘चोकर्स’ असं उगाच नाही म्हणतात. या संघानं आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत ९ वेळा पराभव पत्करला आहे. त्यांना फक्त एकदाच उपांत्य फेरीत विजय मिळवता आला आहे. आयसीसी वनडे स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं आत्तापर्यंत ११ उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत. त्यात ९ वेळा पराभव झाला आणि फक्त एकदा १९९८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ढाक्यात विजय मिळवला होता. हा सामना आणि स्पर्धा सोडली, तर आयसीसी स्पर्धांत दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या क्रिकेट क्षमतेचं न्याय देण्यात अपयश आलं आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसमध्ये घराणेशाहीविरोधात आवाज उठू लागला

झारखंड विधिमंडळ पक्ष नेतेपदी बाबुलाल मरांडी

नौदलात सामील होण्यासाठी २,९७२ अग्निवीर सज्ज

देवभूमी उत्तराखंड अध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण

१९९९ च्या क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एजबेस्टनमध्ये झालेला उपांत्य सामना बरोबरीत सुटला होता. दबावाखाली कोसळण्याचं हे आणखी एक मोठं उदाहरण होतं. लान्स क्लूजनरच्या अप्रतिम फलंदाजीनंतरही अ‍ॅलन डोनाल्डच्या रनआउटनं दक्षिण आफ्रिकेला मोठा फटका बसला. त्या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरी गाठता आलीच पण ती स्पर्धाही जिंकता आली.

 

आयसीसी वनडे स्पर्धेत कोणत्याही संघाने इतके उपांत्य फेरीचे सामने गमावलेले नाहीत. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे, ज्यांनी १३ उपांत्य फेरीत ८ पराभव पत्करले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत न्यूझीलंडची कामगिरी अधिक चांगली आहे.

Exit mobile version