माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी दिलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद थांबण्याचे नाव घेत नाही. या मुद्द्यावर आता भाजपचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाहीविरोधात आवाज उठू लागला आहे. मणिशंकर अय्यर यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की, घराणेशाही संपवली पाहिजे. जे लायक नव्हते, त्यांना पंतप्रधान बनवण्यात आले. आधी राजीव गांधी यांना पंतप्रधान केले, त्यानंतर सोनिया गांधी यांनाही त्या पदावर आणण्याचा प्रयत्न झाला. आता राहुल गांधींना पुढे आणण्याचे काम सुरू आहे.
काँग्रेस आता घराणेशाहीपासून मुक्त होऊ पाहत आहे, त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गेंनीही खोट्या राजकारणाचा आधार घेणे थांबवले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगत भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. जनतेने घराणेशाही नाकारली असून आता केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत.
हेही वाचा..
मुस्लिम संघटनेची मागणी, तेलुगू भाषेतील ‘छावा’चे प्रदर्शन थांबवा!
भय्याजी जोशी म्हणाले, ‘मुंबईची भाषा मराठीच, यात दुमत नाही’
जयशंकर यांच्या ताफ्यासमोर खलिस्तानींच्या निदर्शनावर भारताने ब्रिटनला सुनावले
सैन्याच्या विमानातून नागरी वस्तीत चुकून झाला बॉम्बवर्षाव आणि…
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काश्मीरबाबत दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना दुष्यंत गौतम म्हणाले पीओके (पाकव्याप्त काश्मीर) भारताचा अविभाज्य भाग आहे. आमच्या विधानसभेतही त्यासाठी जागा राखीव आहेत. परंतु तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीच्या धोरणांमुळे पीओके भारतापासून अलग झाला. त्या संदर्भातील दस्तऐवज आमच्याकडे उपलब्ध आहेत.
पीओकेतील जनता भारतात यायला इच्छुक आहे. पाकिस्तानने शांततेच्या मार्गाने पीओके भारताला परत दिला पाहिजे. अन्यथा भविष्यात तो स्वयंस्फूर्तपणे भारतात विलीन होईल. ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाचा वेग वाढला. आज काश्मीर मुख्य प्रवाहात सामील झाला आहे. जिथे पूर्वी तरुणांच्या हातात दगड असायचे, तिथे आता टॅब्लेट्स दिसत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन वाढले आहे, रोजचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध झाले आहे. कॉलेज, विद्यापीठे आणि चित्रपटगृहे सुरू झाली आहेत, लोक आनंदी आहेत. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर प्रगतीचा वेग वाढला असून त्याचे सकारात्मक परिणाम पीओकेमध्येही दिसू लागले आहेत. अरविंद केजरीवालांवर निशाणा साधताना ते म्हणाले, केजरीवाल यांनी पंजाबमध्ये महिलांना पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तीन वर्षे झाली तरी ते पूर्ण झाले नाही.