24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषआरआरआर ऑस्करच्या शर्यतीत, १४ विभागात नामांकन

आरआरआर ऑस्करच्या शर्यतीत, १४ विभागात नामांकन

Google News Follow

Related

एस.एस राजामौली यांचा आरआरआर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने भारतातच नाही तर जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली होती. आता हा आरआरआर सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे ऑस्कर पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.

अभिनेता ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. भारताबरोबरच परदेशातही हा चित्रपट तुफान हिट झाला आहे. भारताकडून ऑस्करसाठी ‘आरआरआर’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ यापैकी एक चित्रपट पाठवण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अखेरच्या क्षणी ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटानं बाजी मारली होती. जगभरात प्रतिसाद मिळत असल्यानं आरआरआर ऑस्करसाठी योग्य ठरला असता, अशी निर्मात्यांची भावना होती. मात्र, अधिकृत एन्ट्री न मिळू शकल्यानं आता व्यक्तिगतरित्या आरआरआर स्पर्धेत उतरला आहे.

हे ही वाचा:

ईडीचे दिल्ली-पंजाब आणि हैदराबादमधील ३५ ठिकाणी छापे

धनुष्यबाणाचा निर्णय लांबणीवर

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

आरआरआर सिनेमाने एक दोन नाही तर चौदा विभागांत नामांकन पाठवले आहे. पुढील चौदा विभागांमध्ये आरआरआर सिनेमाने नामांकन पाठवले आहे.

  • सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर – डी.वी.वी. दानय्या
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – एस.एस. राजामौली
  • सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची कथा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – एन.टी. रामाराव ज्युनिअर आणि राम चरण
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – आलिया भट्ट
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अजय देवगण
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट व्ही. श्रीनिवास मोहन (VFX पर्यवेक्षक)
  • सर्वोत्कृष्ट मूळ गाणे – नातू नातू
  • सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर – एमएम कीरावानी याशिवाय सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन, सर्वोत्कृष्ट संपादन, सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टाइलिंग या श्रेणींमध्येही चित्रपटाला नामांकन मिळाले आहे.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा