गुरुवारी (१० जुलै) सकाळी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजता हे धक्के काही सेकंदांपर्यंत जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, हरियाणाच्या झज्जर येथे सकाळी ९.०४ वाजता ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भाग राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे आणि दिल्लीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.
एनसीआरमधील दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील सोनीपत, रोहतक आणि हिसार येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांनी त्यांच्या घरांमध्ये किंवा परिसरात झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे दृश्ये शेअर केली आहेत.







