28 C
Mumbai
Saturday, December 27, 2025
घरविशेष'मुंबई क्रिकेटची दुसरी फळी तयार करण्यात निवड समिती अपयशी'

‘मुंबई क्रिकेटची दुसरी फळी तयार करण्यात निवड समिती अपयशी’

Google News Follow

Related

मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची टीका

२०१२- १३ च्या हंगामात मुंबईला रणजी विजेतेपद मिळवून देणारे मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी मुंबईच्या विद्यमान संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दर्जेदार गोलंदाजांना का वगळण्यात आले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विशेषतः वेगवान गोलंदाज मिनाद मांजरेकरला वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि मुंबईची दुसरी फळी तयार करण्यात निवड समिती सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखाली सध्या संघनिवड समिती कार्यरत आहे.

२०१७ ते २०२० पर्यंत मांजरेकरने मुंबईमध्ये १९ वर्षाखालील आणि २३ वर्षंखालील संघासाठी खेळताना तब्बल १२० विकेट्स घेतल्या. मुंबई संघासाठी २३ वर्षाखालील संघात त्याने दोन हंगामात ५०० धावा करण्यासोबतच ८३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर सुद्धा त्याने चांगलीच कामगिरी केली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याने पद्माकर तालीम T20 स्पर्धेत पाक्रोफिन संघाकडून खेळताना सिंधविरुद्ध  हॅटट्रिक घेत १४ धावांत ४ बळी घेतले होते.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कुलकर्णी म्हणतात की, ” मांजरेकर हा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. भविष्यात तो भारतासाठी खेळू शकतो. तो ताशी १३५ किमी वेगाने गोलंदाजी करतो. मात्र तो अन्यायाला बळी पडला आहे. त्याच्याकडे मुंबई निवड समितीकडून दुर्लक्ष होत आहे.”

आयडीबीआय फेडरल बोलिंग फाऊंडेशनच्या अंतर्गत ऑस्ट्रेलियाला जेफ थॉमसन यांच्या देखरेखीखाली शिकायला तो गेला होता. तेव्हा प्रसिध कृष्णा, डेव्हिड मथायस, तुषार देशपांडे हे गोलंदाजही त्याच्यासोबत होते. त्यावेळी जेसन गिलेस्पी आणि मायकेल कॅस्प्रोविच यांनी मिनादच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते.

कुलकर्णी पुढे हेही म्हणाले की,” आणखी तीन वेगवान गोलंदाज संधी मिळण्यास पात्र होते, ते म्हणजे कृतिक हंगावडी, अंजदीप लाड आणि सक्षम झा. हे अन्य वेगवान गोलंदाज आहेत ज्यांना संधी द्यायला हवी होती. या गोलंदाजांनी बेंच स्ट्रेंथ मजबूत बनवण्यास मदत केली असती, ज्याची मुंबई संघाला सध्या गरज आहे. जर भारत कसोटीत चांगली कामगिरी करत असेल तर आमची बेंच स्ट्रेंथ चांगली आहे. खेदाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या बाबतीत तसं झालं नाही. गेल्या दोन तीन वर्षांपासून आम्ही आमची बेंच स्ट्रेंथ वाढवण्याकडे लक्ष दिलेलं नाही.

हे ही वाचा:

अंतिम दिवशी ई-फायलिंग पोर्टलवर करोडो रुपयांचा परतावा

१२ कोटींच्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला जनतेचे आशीर्वाद लागतात…

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात वाढविले कृषी कर्जाचे लक्ष्य…वाचा सविस्तर

…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय

 

तसेच, गोलंदाज आतिफ अत्तरवाला हा संघाचा भाग असूनही विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळता आले नाही. आणि बऱ्याच सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी न मिळाल्याने कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा