भारतीय क्रिकेटचा ‘लिटिल मास्टर’ सुनील गावसकर हे क्रिकेटजगतातील महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी अशा काळात क्रिकेट खेळला, जेव्हा जलदगती गोलंदाजांचा दबदबा होता आणि खेळाडूंकडे आजसारखे आधुनिक बॅट्स किंवा सुरक्षात्मक साधने नव्हती.
१० जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मलेल्या गावसकरांचं शरीर छोटे, पण मन मात्र प्रचंड मोठं होतं. मैदानावर ते नेहमी निडर, ठाम आणि बेखौफ असायचे.
१९८१ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. भारताने सिडनीतील पहिला सामना गमावला होता, दुसरा सामना कसातरी ड्रॉ झाला आणि तिसऱ्या कसोटीवर साऱ्या मालिकेचं भवितव्य अवलंबून होतं.
पहिल्या डावात भारत २३७ धावांवर आटोपला, तर ऑस्ट्रेलियाने ४१९ धावा करून मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात गावसकर आणि चेतन चौहान या सलामी जोडीने १६५ धावांची भागीदारी केली. गावसकर ७० धावांवर खेळत असताना डेनिस लिलीच्या एका चेंडूवर त्यांना अंपायर रेक्स व्हाइटफील्ड यांनी एलबीडब्ल्यू आउट दिलं.
गावसकर या निर्णयावर संतापले. त्यांनी अंपायरला समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर पॅव्हेलियनकडे जात असतानाच त्यांनी चेतन चौहानलाही ‘मैदान सोड’ असं सांगितलं. चेतन चौहानही मैदान सोडून परतू लागले. पण संघाचे मॅनेजर एस.ए.के. दुर्रानी यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि चौहानला थांबवलं.
या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात ३२४ धावा केल्या. त्यानंतर कपिल देवच्या दमदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला फक्त ८३ धावांत गुंडाळलं आणि भारताने सामना ५९ धावांनी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत राखली.
हेही वाचा:
“न्यूझीलंडला धक्का! फिन अॅलन त्रिकोणी मालिकेबाहेर
गुजरात घटना : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान मोदींचा ब्राझीलच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव
आंदोलकांना ‘शोधा आणि गोळ्या’ घाला!
पुढील काही वर्षांनी गावसकर यांनी स्पष्ट केलं की ते अंपायरवर नव्हे, तर ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिलेल्या अपशब्दांवरून संतापले होते. त्यामुळे त्यांनी चेतन चौहानला मैदानाबाहेर बोलावलं.
गावसकर यांनी भारतासाठी १२५ कसोटी सामने खेळून १०,१२२ धावा, १०८ वनडेमध्ये ३,०९२ धावा केल्या. त्यांच्या नावावर ४ दुहेरी शतके, ३४ शतके आणि ४५ अर्धशतके आहेत. ते आजही लाखो क्रिकेटप्रेमीयांच्या मनात आदराने विराजमान आहेत.







