25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषस्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी लँडिंग; सुनीता विल्यम्स २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतल्या

स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी लँडिंग; सुनीता विल्यम्स २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतल्या

भारतीय वेळेनुसार पहाटे ३:३० वाजता स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरले

Google News Follow

Related

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परतले आहेत. तब्बल २८६ दिवसांनी म्हणजेच सुमारे ९ महिन्यांनी त्यांनी पृथ्वीवर आपले पाऊल ठेवले आहे. आठ दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) गेले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे दोघेही तेथेच अडकून पडले आणि आता थेट नऊ महिन्यांनी ते पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३:३० वाजता स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरले. या लँडिंगसह ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचा शेवट झाला. कॅप्सूल समुद्रात यशस्वीरित्या उतरल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सर्वांनीच निःश्वास सोडला.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नऊ महिने अडकल्यानंतर, नासाच्या बोईंग स्टारलाइनर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीवर परतले आहेत. हे अंतराळवीर फक्त आठ दिवसांसाठी निघाले होते. पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तिथे ९ महिने घालवावे लागले. ५ जून २०२४ रोजी त्यांना बोईंगच्या नवीन स्टारलाइनर क्रू कॅप्सूलद्वारे त्यांना अवकाशात पाठवण्यात आले. विल्मोर आणि विल्यम्स यांनी अंतराळात २८६ दिवस घालवले, जे मूळ नियोजित वेळेपेक्षा २७८ दिवस जास्त होते. त्यांच्या परतीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून होते.

दोन अंतराळवीरांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात असतानाचं क्रू-10 मोहिमेतील अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहचले आणि त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. चार सदस्यांच्या क्रू-10 टीममध्ये नासाच्या अंतराळवीर अॅन मॅकक्लेन, निकोल आयर्स, जपानचे ताकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. जूनपासून मोहिमेमध्ये अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची जागा घेण्यासाठी हे पथक अंतराळ स्थानकात पोहचले.

ट्रम्प यांनी पूर्ण केले आश्वासन- व्हाईट हाऊस

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्याचे आश्वासन दिले होते आणि ते वचन आता पूर्ण झाले आहे, असे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर सुरक्षितपणे परतल्यानंतर व्हाईट हाऊसने सांगितले. “वचन दिले, वचन पाळले: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नऊ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना वाचवण्याचे वचन दिले. आज, ते अमेरिकेत सुरक्षितपणे उतरले,” असे व्हाईट हाऊसने ट्विट केले आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क, कंपनी आणि नासाचे आभार मानले.

हे ही वाचा : 

वाहने पेटवली ती हिंदूंची, घटनेवेळी मुस्लिमांचे एकही वाहन पार्क नव्हते!

मुख्यमंत्र्यांचा जखमी पोलिसांशी संवाद; कामाचे कौतुक करत बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

हे तर घडणारच होते…

‘हिंदू तालिबान’ शब्दावरून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाईंविरोधात तक्रार

सुनीता विल्यम्स यांच्या स्वागतासाठी जमले डॉल्फिन

२८६ दिवस अवकाशात, ४५७७ वेळा ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालून आणि १९५.२ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम सुरक्षितपणे घरी परतल्या आहेत. जगभरातून त्यांचे स्वागत होत असतानाचं काही विशेष पाहुण्यांनीही त्यांच्या आगमनाचे स्वागत केले. फ्लोरिडाच्या आखाती किनाऱ्यावर खाली उतरलेल्या क्रू-९ अंतराळवीरांचे डॉल्फिनने स्वागत केले. स्पेसएक्सच्या ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलभोवती डॉल्फिनचा एक समूह उत्सुकतेने जमला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा