31 C
Mumbai
Sunday, April 5, 2026
घरविशेषमुंबईत आज ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ बैठकीचे आयोजन

मुंबईत आज ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ बैठकीचे आयोजन

कारुळकर प्रतिष्ठानमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Google News Follow

Related

देशातील तरुणांना स्वरोजगार आणि उद्योजकतेच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी स्वदेशी जागरण मंच यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्थानिक स्तरावर विविध बैठका, कार्यशाळा आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच उपक्रमांतर्गत मुंबईत करुळकर प्रतिष्ठानमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. करुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत करुळकर हे देखील या कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीला मंचाचे अखिल भारतीय सहसंघटक सतीशकुमारजी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून स्वदेशीच्या संकल्पनेला बळ देत तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. सतीशकुमारजी यांचा ५ आणि ६ एप्रिल असा मुंबई दौरा असून, या काळात विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधून अभियानाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

ही बैठक ५ एप्रिल रोजी कारुळकर प्रतिष्ठान, ६०३, वेस्टर्न एज I, मेट्रो मॉलच्यावर बोरीवली पूर्व मुंबई येथे होणार असून स्वदेशी स्वावलंबी भारत अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील युवकांना नोकरीच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून त्यांना स्वतःचा उद्योग उभारण्यास प्रोत्साहित करणे. स्थानिक उत्पादन, कौशल्यविकास आणि नवकल्पनांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधण्याचा संदेश या अभियानातून दिला जात आहे. ‘स्वदेशी’ या संकल्पनेचा अर्थ केवळ भारतीय वस्तूंचा वापर एवढाच नसून, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून आत्मनिर्भर भारत घडवणे हा आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

प्रांत सह संयोजक चेतन टाक यांनी या बैठकीसाठी सर्व संबंधितांना सादर निमंत्रण दिले आहे. “ही बैठक केवळ चर्चा न राहता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल,” असे त्यांनी सांगितले. युवक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वदेशी विचारांशी बांधिल असलेले सर्व घटक या बैठकीत सहभागी होणार आहेत.

बैठकीत स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक धोरणे, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी, तसेच नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन यावर सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः डिजिटल युगात स्वदेशी उद्योग कसे विकसित करता येतील, यावरही भर दिला जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा