भारताविरोधात कारवाई करणे पाकिस्तानच्या कल्पनेबाहेरचे

संरक्षण तज्ज्ञ ध्रुव सी. कटोच

भारताविरोधात कारवाई करणे पाकिस्तानच्या कल्पनेबाहेरचे

पाकिस्तानला फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही धोका आहे. संरक्षण तज्ज्ञ ध्रुव सी. कटोच यांचे मत आहे की चौफेर संकटांनी वेढलेला देश भारताला डोळे दाखवण्याची कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी सांगितले की, ‘बलोच लिबरेशन आर्मी’ त्यांना आतून कमजोर करत आहे, तर सीमांवर भारताबरोबरच अफगाणिस्तानही आव्हान देत आहे. बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी लष्करावर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या एका वाहनाला लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये १२ सैनिक ठार झाले. हा हल्ला भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झाला, ज्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.

संरक्षण तज्ज्ञ ध्रुव कटोच म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी बलोच लिबरेशन आर्मीने एक रेल्वे हायजॅक केली होती. सतत पाकिस्तानी लष्कराचे जवान तिथे मारले जात आहेत. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानची केवळ भारतासोबतच नव्हे तर अफगाणिस्तान सीमावरही स्थिती चांगली नाही. बलूचिस्तानमधील परिस्थितीही वाईट आहे. तिथे बलोच लिबरेशन आर्मी सतत पाक लष्करावर हल्ले करत आहे. बलोच लिबरेशन आर्मी आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देत आहे.

हेही वाचा..

पाकिस्तानकडून बनावट व्हिडीओद्वारे दिशाभूल

बलुच बंडखोरांनी पाक सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला उडवले; १२ सैनिक ठार

‘माझे वडील तुरुंगात शांत आयुष्य जगताहेत, पण मोदी त्यांना मारू इच्छितात’

गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू

त्यांनी स्पष्ट केले की, मला वाटत नाही की येणाऱ्या काळात शत्रुराष्ट्राला काही दिलासा मिळणार आहे कारण बलोचांचे हल्ले अधिक तीव्र होत चालले आहेत. अनेक वर्षांपासून पाकिस्तान बलोच लोकांना त्यांचा हक्क देत नाही. काल रात्रीचा हल्ला पाहता असं वाटतं की हे हल्ले अजून वाढतील. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून प्रतिउत्तर देण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी सांगितले की, भारतासोबत पाकिस्तानचा जेवढा उर्मटपणा होता, तो आपण पाहिला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या प्रत्युत्तरात जर पाकिस्तान काही कारवाई करेल, तर भारत आणखी भयानक प्रत्युत्तर देईल. मला वाटत नाही की पाकिस्तान सध्या कोणतीही कारवाई करण्याच्या स्थितीत आहे. पाकिस्तानची परिस्थिती गंभीर आहे, आणि जर त्यांनी ती सावरली नाही, तर त्यांचे भवितव्य अधिकच भयानक होऊ शकते.

Exit mobile version