28 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरविशेषए आर रहमान यांच्या विधानावर लेखिका तस्लिमा नसरीन नाराज

ए आर रहमान यांच्या विधानावर लेखिका तस्लिमा नसरीन नाराज

श्रीमंत-प्रसिद्ध लोकांसोबत भेदभाव होत नाही

Google News Follow

Related

प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी संगीतकार ए. आर. रहमान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत स्पष्ट मत मांडले आहे. त्यांनी म्हटले की, ए. आर. रहमान हे इतके श्रीमंत आणि प्रसिद्ध आहेत की त्यांना धार्मिक भेदभावाचा सामना करावा लागतो, असे म्हणणे योग्य नाही.

काही दिवसांपूर्वी ए. आर. रहमान यांनी एका मुलाखतीत कामाच्या संधी कमी होत असल्याबद्दल भाष्य करताना, यामागे समप्रदायवादी वातावरण कारणीभूत असू शकते, असे संकेत दिले होते. यावर सोशल मीडियावर मोठा वाद झाला.
हे ही वाचा:
IMF कडून भारतासाठी दिलासादायक अंदाज

पंतप्रधान मोदींकडून युएई राष्ट्रपतींचे स्वागत

२०२५ मध्ये बांगलादेशात अल्पसंख्यांकांशी संबंधित ६४५ गुन्हेगारी घटना

युरोपियन युनियन अमेरिकवर लावणार आता भरभक्कम टॅरिफ

या वादावर प्रतिक्रिया देताना तसलीमा नसरीन यांनी सांगितले की, खऱ्या अडचणी गरीब आणि सामान्य लोकांनाच सहन कराव्या लागतात. प्रसिद्धी, पैसा आणि सन्मान असलेल्या लोकांना समाजात कोणीही सहजपणे डावलू शकत नाही. “मी स्वतः अनेकदा भेदभाव अनुभवला आहे. घर भाड्याने मिळत नाही, धमक्या दिल्या जातात, मारहाण होते—या गोष्टी श्रीमंत आणि सेलिब्रिटी लोकांच्या वाट्याला सहसा येत नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नसरीन पुढे म्हणाल्या की, त्या नास्तिक (एथीस्ट) असल्या तरी केवळ नावावरून त्यांना मुस्लिम समजले जाते आणि त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी त्रास सहन करावा लागला आहे. समाजातील धार्मिक अज्ञान आणि असहिष्णुता हीच या सगळ्याची मुळे असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ए. आर. रहमान यांनीही या वादानंतर स्पष्टीकरण दिले आहे. आपले वक्तव्य कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हते आणि संगीताच्या माध्यमातून समाजाला जोडणे हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा