29 C
Mumbai
Sunday, April 5, 2026
घरविशेषहनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘रामायण’चा टीझर रिलीज

हनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘रामायण’चा टीझर रिलीज

रणबीर कपूरचा ‘श्रीराम’ अवतार झळकला

Google News Follow

Related

नितेश तिवारी दिग्दर्शित पौराणिक कथेवरील चित्रपट ‘रामायण’चा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांकडून जबरदस्त चर्चा असून अखेर हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुक चाहत्यांसोबत शेअर केला. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारत असून त्याचा लुक समोर आला आहे.

टीझरमध्ये रणबीर कपूर यांचा श्रीरामाच्या अवतारातील लुक अत्यंत प्रभावी दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, वेशभूषा आणि सादरीकरणातील बारकावे यांनी रामाचे पात्र जिवंत केले आहे. टीझरमध्ये यश रावणाच्या भूमिकेत, तर रवि दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसतात. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत झळकते. जरी टीझरचा मुख्य फोकस श्रीरामावर असला तरी इतर पात्रांच्या झलकांनी कथानकाची उत्कंठा वाढवली आहे.

रणबीर कपूर याने हा फर्स्ट लुक शेअर करताना सांगितले की, रामाचे पात्र साकारणे हा त्यांच्यासाठी अत्यंत नम्र करणारा अनुभव होता. तो म्हणाले, “मी रामांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आहे असे मला वाटत नाही; मी त्यांच्याकडून शिकण्यासाठी आलो आहे. रामांमधील साधेपणा आणि पवित्रता अत्यंत दुर्मिळ आहे. ते समजून घेणे आणि आत्मसात करणे माझ्यासाठी नम्र करणारा अनुभव होता.” रणबीर पुढे म्हणाला की, रामांची ही कथा केवळ शक्ती किंवा विजयाची नाही, तर एका माणसाच्या निवडी, कर्तव्य आणि नैतिकतेची कहाणी आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीही टीझरच्या रिलीजवेळी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “रामायणाची महानता तिच्या भावनांमध्ये आणि मानवी मूल्यांमध्ये आहे. ही कथा फक्त चांगले आणि वाईट यांच्यातील नाही, तर योग्य-अयोग्य यामधील निवड आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची आहे. रामांचा प्रवास अत्यंत मानवी आहे आणि आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.” ते पुढे म्हणाले, “रामाचे पात्र प्रेक्षकांना अशा नायकाची आठवण करून देते, जो नेहमी आपल्या इच्छांपेक्षा आणि स्वार्थापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतो.”

हे ही वाचा:

“प. बंगालच्या मालदामधील घटना म्हणजे न्यायालयाच्या अधिकाराला दिलेले आव्हान”

“ऑपरेशन सिंदूरवेळी, भारत समुद्रातून पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या काही मिनिटांवर होता”

२०२५-२६ आर्थिक वर्षात भारताची संरक्षण निर्यात ३८,४२४ कोटींवर

महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील कस्टम ड्युटी माफ

या चित्रपटात रामाच्या भूमिकेसोबत इतर अनेक प्रमुख कलाकारही झळकणार आहेत. यात साई पल्लवी, यश, रवि दुबे, सनी देओल, लारा दत्ता आणि अमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. चित्रपटाच्या संगीतासाठी दोन दिग्गज संगीतकार – हंस जिमर आणि ए. आर. रहमान- यांचे योगदान आहे. तसेच, हॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टंट डायरेक्टर्स टेरी नॉटरी आणि गाइ नॉरिस यांनी देव- राक्षसांच्या युद्ध दृश्यांसाठी अॅक्शन कोरिओग्राफी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा