28 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरविशेषपायलट नमांश स्याल यांच्या सर्वोच्च बलिदानाला देश कधीच विसरणार नाही

पायलट नमांश स्याल यांच्या सर्वोच्च बलिदानाला देश कधीच विसरणार नाही

भारतीय वायूदलाने वाहिली श्रद्धांजली

Google News Follow

Related

दुबई एअर शो २०२५ मध्ये तेजस विमान अपघातात शहीद झालेल्या फायटर पायलट नमन स्याल यांचे पार्थिव शरीर रविवारी स्वदेशात आणण्यात आले. भारतीय वायुदलाच्या सी-१३० विमानाद्वारे पार्थिव शरीराचे दक्षिण वायुकमानाच्या एअरबेसवर आणण्यात आले.

हुतात्मा नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याचे रहिवासी होते. एअरबेसवर आयोजित सन्मान समारंभात भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी हुतात्मा पायलटला शेवटचा निरोप दिला. सैन्य बँडच्या उपस्थितीत वायुदलाच्या तुकडीने नमांश स्याल यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.

या प्रसंगी वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्र पायलट स्याल यांच्या सर्वोच्च बलिदानाला कधीच विसरणार नाही. दक्षिण वायुकमानातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हुतात्म्याच्या कुटुंबियांचे प्रति गहिरे सांत्वन व्यक्त केले. या कठीण काळात वायुदल नमन स्याल यांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे उभे असल्याचे आणि पूर्ण मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘निवडणुकीत घोळ झालाय, पण पुरावा नाही!’

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या, प्रेयसीवरून झाला वाद

महायुतीच्या मंत्र्याची पॅण्ट उतरवण्याची अस्लमची धमकी; पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

भाजपाला सद्बुद्धी कोण देणार?

वायुदलाने असेही म्हटले की, देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत प्रत्येक वीर सैनिकाच्या कुटुंबाचा सन्मान व काळजी घेणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सन्मान समारंभानंतर नमन स्याल यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाने त्यांच्या कांगडा येथील मूळ गावी रवाना करण्यात आले. येथे पार्थिवावर अंतिम संस्कार पूर्ण लष्करी इतमामाने होणार आहेत. कांगडा येथे स्थानिक प्रशासन, सेना, माजी सैनिक संघटना आणि हजारो नागरिक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एकत्र येत आहेत.

तेजस विमानाचा अपघात संपूर्ण देशभरात दु:खाची लाट निर्माण करणारा ठरला आहे. दुबई एअर शो २०२५ मध्ये शुक्रवारी भारतीय वायुदलाचे अत्याधुनिक स्वदेशी लढाऊ विमान एलसीए तेजस हे प्रात्यक्षिक उड्डाणादरम्यान कोसळले होते. या दुर्घटनेत पायलटचे निधन झाले. वायुदलाने या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी नियुक्त केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात त्या वेळी झाला जेव्हा तेजस एरोबॅटिक प्रात्यक्षिकासाठी ठरलेले उड्डाण करत होते. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वायुदलाकडून सर्व आवश्यक माहिती गोळा केली जात आहे.

वायुदलाने सांगितले की, अपघातात पायलट गंभीर जखमी झाले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला. वायुदलाने या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की पायलटच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी अत्यंत वेदनादायक आहे आणि या कठीण काळात ते शोकाकुल कुटुंबासोबत भक्कमपणे उभे आहेत. उड्डाणाच्या तांत्रिक, कार्यप्रणाली आणि सुरक्षा संबंधित सर्व बाबींचे परीक्षण करून अपघाताचे खरे कारण शोधले जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा