बिहार दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते दिलीप घोष यांची प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यादव यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते दिलीप घोष म्हणाले, “त्यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा. ओडिशा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री कुठे गेले, हे बघा. बिहारच्या जनतेने त्यांच्या (तेजस्वी यादव यांच्या) कुटुंबाने राज्यासाठी काय केलं आहे, हे अजून विसरलेले नाहीत.”







