२७ वर्षांपूर्वी एका प्राणघातक विमान अपघातातून वाचलेल्या एका थाई अभिनेता-गायकाला एअर इंडियाच्या दुर्घटनेची माहिती मिळाली तेव्हा एक विचित्र योगायोग लक्षात आला. या दुर्घटनेत बचावलेला प्रवासी सुद्धा त्याच्यासारखाच आसनावर, ‘११ अ’ वर बसला होता.
रुआंगसाक लोयचुसाक असे थाई अभिनेत्याचे नवा आहे आणि त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. ही माहिती समोर येताच सोशल मिडीयावर बरीच चर्चा होत आहे. अभिनेता रुआंगसाक लोयचुसाकने पोस्टमध्ये म्हटले, ११ डिसेंबर १९९८ रोजी, थाई एअरवेजचे फ्लाईट TG२६१ दक्षिण थायलंडमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी विमानात बिघाड झाली आणि विमान दलदलीच्या ठिकाणी कोसळले, यामध्ये २० वर्षीय रुआंगसाक लोयचुसाक हे सुद्धा प्रवास करत होते. त्यावेळी झालेल्या विमान दुर्घटनेत १४६ पैकी १०१ जणांचा मृत्यू झाला होता.
अहमदाबाद एअर इंडिया फ्लाइट AI१७१ अपघातात चमत्कारिकरित्या बचावलेले ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश हे सीट नंबर ११ A वर बसले होते आणि हे कळताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या, असे आता ४७ वर्षांचे रुआंगसाक म्हणाले. थाई भाषेत लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये रुआंगसाक म्हणाले, “भारतात झालेल्या विमान अपघातातून वाचलेला तो माझ्यासारख्याच सीटवर बसला होता, ११अ.” वृत्तानुसार, त्यांनी एक दशक पुन्हा विमान प्रवास केला नाही. दरम्यान, थाई अभिनेत्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा योगायोगच म्हणावा, अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत.
हे ही वाचा :
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मिशन १९ जूनला
इस्रायलने भारताचा चुकीचा नकाशा दाखवला, संतापानंतर मागितली माफी!
‘जे पाहिलं ते अत्यंत भयावह होतं’
११अ सीटवरील चमत्कारिकपणे बचावलेले रमेश म्हणाले की, विमानातील इतर सर्वजण मृत्युमुखी पडल्यानंतर मी कसा वाचला हे मला माहित नाही. “काही काळासाठी मला वाटलं की मीही मरणार आहे. पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला जाणवलं की मी जिवंत आहे आणि मी स्वतःला सीटवरून बाहेर काढण्याचा आणि शक्य तितका पळून जाण्याचा प्रयत्न केला.”







