“मुख्यमंत्र्यांनी मला न्याय दिला, अतिक अहमदसारख्या गुन्हेगाराचा अंत केला”

विधानसभेत आमदार पूजा पाल यांचे वक्तव्य

“मुख्यमंत्र्यांनी मला न्याय दिला, अतिक अहमदसारख्या गुन्हेगाराचा अंत केला”

उत्तर प्रदेश विधानसभेत ‘व्हिजन डॉक्युमेंट २०४७’ वर सुरू असलेल्या २४ तासांच्या मॅराथॉन चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाच्या बंडखोर आमदार पूजा पाल यांनी भावनिक भाषण करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवून माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय दिला आहे. याच धोरणामुळे अतिक अहमदसारख्या गुन्हेगारांचा अंत झाला.”

पूजा पाल पुढे म्हणाल्या, “सगळ्यांना माहिती आहे की माझ्या पतीचा खून कोणी केला… पण कोणीही आवाज उठवला नाही. त्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला ऐकून घेतलं आणि न्याय दिला. प्रयागराजमधील माझ्यासारख्या अनेक महिलांना त्यांनी न्याय दिला.”

त्यांनी ठामपणे सांगितले, “‘माझ्या पतीचा खुनी अतिक अहमद याला मुख्यमंत्र्यांनी जमिनीत गाडण्याचे काम केले’… जेव्हा मला वाटलं की आता मी थकले आहे, लढू शकत नाही, तेव्हा मुख्यमंत्री माझ्या पाठीशी उभे राहिले. आज संपूर्ण राज्य मुख्यमंत्र्यांकडे विश्वासाने पाहत आहे.”

दरम्यान, राजू पाल यांची हत्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक अत्यंत धक्कादायक आणि चर्चेची घटना होती. ही हत्या २००५ साली घडली होती आणि ती आजही अनेक राजकीय आणि गुन्हेगारी चर्चांचा विषय आहे. राजू पाल हे समाजवादी पक्षाचे (SP) नेते होते. त्यांनी प्रयागराज (तेव्हचा इलाहाबाद) पश्चिम मतदारसंघातून २००४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून माजी खासदार अतीक अहमदच्या भाऊ अशरफ अहमदचा पराभव केला होता. त्यांच्या या विजयामुळे अतीक अहमदच्या प्रभावाला जबरदस्त धक्का बसला होता.

हे ही वाचा : 

हिंदी चित्रपटांनी मांडला फाळणीचा वेदनादायी इतिहास

निवृत्त न्यायाधीशाच्या घरावर दरोडा! 

छत्रपती संभाजीनगरमध्ये ६५९१ भोंगे पोलिसांनी हटवले!

युक्रेन युद्ध थांबवा, नाहीतर… पुतीन यांना कुणी दिली धमकी?

२५ जानेवारी २००५ रोजी, राजू पाल यांची प्रयागराज शहरात भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मुख्य आरोपी म्हणून माजी खासदार अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांचे नाव समोर आले. यानंतर या प्रकरणात साक्षीदार असलेले उमेश पाल यांची देखील २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रयागराजमधील त्यांच्या घराजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास भरदिवसा गोळ्या झाडून आणि बॉम्बने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यात त्यांचे दोन सुरक्षारक्षकही ठार झाले.

या प्रकरणात आरोपी म्हणून अतीक अहमदचा मुलगा असद अहमदसह अनेक जणांची ओळख पटली. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि अनेक एनकाउंटर केले. असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघे झाशीमध्ये एप्रिल २०२३ मध्ये पोलिस एनकाउंटरमध्ये ठार झाले. याच घटनेनंतर काही दिवसांतच अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची हत्या पोलिस संरक्षणात, मीडियासमोरच करण्यात आली. ही हत्या जेलमध्ये जात असताना मेडिकल तपासणीच्या वेळी घडली.

Exit mobile version