26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषव्हायरल गर्ल मोनालिसाला ऑफर देणारा दिग्दर्शक निघाला बलात्कारी

व्हायरल गर्ल मोनालिसाला ऑफर देणारा दिग्दर्शक निघाला बलात्कारी

Google News Follow

Related

प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, मारहाण, गर्भपात करण्यास भाग पाडणे आणि धमकी देणे यासारखे गंभीर आरोप आहेत.

आरोपानुसार, सनोज मिश्रा याने एका लहान गावातून आलेल्या महिलेवर बलात्कार केला आणि तिचा तीन वेळा गर्भपात घडवून आणला. सेंट्रल दिल्ली पोलिसांच्या नबी करीम पोलीस ठाण्याच्या टीमने सनोज मिश्रा याला गाझियाबाद येथून अटक केली आहे. ६ मार्च २०२४ रोजी २८ वर्षीय पीडित महिलेने नबी करीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा..

Meta AI : WhatsApp ईमेज जनरेटर बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

दलाई लामा ‘गोल्ड मर्क्युरी पुरस्कार २०२५’ने सन्मानित

मोदींकडे भारतासाठीचा हजार वर्षांचा दृष्टीकोन!

जोशींनी का सांगितले औरंगजेबचा मुद्दा अनावश्यक ?

त्यानंतर बलात्कार, मारहाण, गर्भपातास भाग पाडणे आणि धमकी देणे या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, सनोज मिश्रा गेली चार वर्षे तिच्यासोबत मुंबईत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. तक्रारीत नमूद केल्यानुसार, त्याने तिला तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपीने तिला नबी करीमच्या एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर त्याने लग्नाच्या आश्वासनावरून हात झटकला. महिलेने सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत आपले जबानी जबाब नोंदवले, ज्यामध्ये तिने आपल्या आरोपांची पुष्टी केली. मुजफ्फरनगर येथून पीडितेच्या गर्भपाताशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे गोळा करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपीची जामीन अर्ज फेटाळला. यानंतर पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी सनोज मिश्रा याला गाझियाबादमधून अटक केली.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा