26 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषमातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचं आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरूवात !

मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजाचं आंदोलन ही उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरूवात !

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर

Google News Follow

Related

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहेत. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा प्रहार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. शिवसेना उबाठा गटाची काल ठाण्यात सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

चंदशेखर बावनकुळे ट्विटकरत म्हणाले की, औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात.

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे यांचं वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा..

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चकमक; दोन जवान हुतात्मा !

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १४ लाख खातेदारांना ५२१६ कोटींचे वाटप

परमबीर यांचा पर्दाफाश करण्याची देशमुखांना संधी…

ते पुढे म्हणाले की, लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत. तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही. लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही? असं म्हणत मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजानं आंदोलनही केलं. भगवं सोडून हिरवं पांघरलं की असंच होणार आहे. ही सुरुवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना विसरलात, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा