प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा पुढील हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा करतील. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नक्की पंतप्रधानांच्या कोणत्यातरी कार्यक्रमाशी आपण जोडलेले राहा.”
त्यांनी यावेळी सांगितले की सर्व कृषी विज्ञान केंद्रे, आयसीएआर संस्थाने, कृषी विद्यापीठे, मंड्या आणि पीएसीएस मुख्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना आवाहन करताना त्यांनी सांगितले, “आपल्या जवळच्या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा आणि पंतप्रधानांचे भाषण ऐका. बुधवारी, पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री चौहान यांनी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. यामध्ये या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR), व कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि इतर प्रमुख अधिकारी या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले.
हेही वाचा..
गर्भाशयात नाहीतर महिलेच्या यकृतात बाळाची वाढ, भारतातील पहिले प्रकरण!
आंध्र प्रदेश मद्यघोटाळा : ११ कोटींची रोकड जप्त
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे आतंकवादाविरोधात कठोर पाऊल
Russia Earthuquake: कुठे आणि कधी आहे त्सुनामीचा खतरा
केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडले जावे आणि हे संपूर्ण देशात एक अभियान म्हणून आयोजित करण्यात यावे. तसेच, कृषक सखी, ड्रोन दीदी, बँक सखी, पशु सखी, विमा सखी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच अशा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती मोठ्या प्रमाणावर पोहोचवावी. याशिवाय खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा सहभाग अधिक बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.







