सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आयएएनएसशी बोलताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सुरक्षितता, विकास आणि समृद्धीसाठी काम करत आहेत, तर विरोधक मात्र मतांच्या राजकारणासाठी अशा लोकांविषयी विचार करत आहेत जे दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. एनडीए सरकार आणि भारतीय लष्कराने जे कार्य केले आहे, ते विरोधकांना पचत नाहीये.
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी ‘ऑपरेशन महादेव’च्या वेळेवर प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना ओम प्रकाश राजभर म्हणाले, “त्यांना याचे दु:ख आहे की या ऑपरेशनमध्ये जे दहशतवादी मारले गेले, ते विशेषतः मुस्लिम का होते? पण त्यांना याची चिंता नाही की पाकिस्तान दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन का देतोय? जगातील अनेक देश दहशतवादाविरोधात एकत्र येऊन तो संपवण्याची गोष्ट करत आहेत. मात्र भारतात विरोधक मुस्लिम मतांसाठी स्पर्धा करत आहेत. म्हणूनच अखिलेश यादव आणि राहुल गांधी संसदेत ओरडत आहेत.”
हेही वाचा..
मानव तस्करी, धर्मांतर प्रकरणी अटकेतील युवकाची जामीन याचिका फेटाळली
किसान सन्मान निधीची पुढची हप्ता २ ऑगस्टला
गर्भाशयात नाहीतर महिलेच्या यकृतात बाळाची वाढ, भारतातील पहिले प्रकरण!
आंध्र प्रदेश मद्यघोटाळा : ११ कोटींची रोकड जप्त
पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबाबत म्हटले होते की, “जगातील कोणत्याही देशाने भारताला रोखले नाही,” यावर बोलताना राजभर म्हणाले की, “विरोधकांनी समजून घेतले पाहिजे की मोदींना काय हवे आहे — देशात विकास, शांतता, सौहार्द, समृद्धी आणि दहशतवादाचा अंत. पीओके (पाक अधिकृत काश्मीर) पुन्हा भारतात सामील न करण्याच्या विरोधकांच्या आरोपांवर राजभर म्हणाले, “काँग्रेस हीच याची जनक आहे. भारत-पाक फाळणी कोणी घडवून आणली? आज त्यांनाच चिंता का वाटते? ६० वर्षे सत्तेत राहूनसुद्धा काँग्रेसने पीओके परत का घेतले नाही? यावर कारवाई सुरू आहे आणि लवकरच पीओके भारताच्या ताब्यात येईल.”
ओम प्रकाश राजभर यांनी विरोधकांना आवाहन केले की, ते देशहितासाठी एकत्र यावे आणि दहशतवादाविरोधात सरकारला पाठिंबा द्यावा. त्यांनी म्हटले, “मोदीजी देशात शांतता आणि विकास आणू इच्छितात. विरोधकांनी मतांच्या राजकारणापासून दूर जाऊन देशासाठी विचार करावा. हाच खरा देशहिताचा मार्ग आहे. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत राजभर म्हणाले की, त्यांची पार्टी एनडीएसोबत मिळून निवडणूक लढवणार आहे. सुभासपाने बिहारमधील १५६ जागांवर संघटन बांधले आहे आणि २९ जागांवर उमेदवारी लढवण्याची योजना आखली आहे. लवकरच बिहारमध्ये एक पत्रकार परिषद आणि जनतेसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.







