27 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरविशेषLadkiBahin: बोगस अर्ज शून्य, पालघरचा प्रामाणिकपणा राज्यासाठी प्रेरणा!

LadkiBahin: बोगस अर्ज शून्य, पालघरचा प्रामाणिकपणा राज्यासाठी प्रेरणा!

Google News Follow

Related

राज्यात सर्वत्र लाडकी बहिण योजनेची सरुवात झाल्यानंतर सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला यानंतर यामध्ये मोठया प्रमाणावर खोट्या लाभार्थ्यांचा शिरकाव झाल्याच्या शक्यतेने मोठया प्रमाणावर अर्जाची छाननी शासनाकडून करण्यात आली.

यामध्ये राज्यातील लाखोंच्या संख्येत अपात्र लाभार्थ्याना या योजनेतुन वगळण्यात आले मात्र मार्च २०२५ पर्यंतची पालघर जिल्ह्यातील आकडेवारी पाहता जिल्ह्यात बोगस अर्जाचे प्रमाण शून्य असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे तब्बल 166 महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडल्याचे सुद्धा समोर आले आहे.

राज्यात लाखोंच्या संख्येत लाडक्या बहिणी वगळण्यात आल्या मात्र पालघर जिल्ह्यातील अपात्र महिलांची आकडेवारी शून्य असल्याने लाभार्थी आणि बालविकास अधिकारी कार्यालयात दोघांचेही कौतुक होत आहे.

जिल्ह्यात एकही बोगस लाभार्थी नसल्याचे समोर आले आहे. याच वेळी दुसरी सकारात्मक बाब म्हणजे १६६ महिलांनी स्वतःहून लाभ सोडल्याचे दिसून आले आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. यामध्ये सुरुवातीला ज्या महिलांनी अर्ज केला त्यासर्व महिलांचे अर्ज मान्य करून या महिलांना लाभ देण्यात आला. मात्र यानंतर शासनाच्या लक्षात आले की योजनेसाठी ठरविलेल्या निकषात न बसलेले सुद्धा अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या लाभर्थ्यांची पुन्हा छाननी करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा