मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण आज (११ मे) झाले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला पुतळा ९३ फुटी असून त्याचे आयुर्मान जवळपास १०० वर्षे असल्याची माहिती आहे. जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. नारायण राणेसह आदी मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने आणि पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा झाला, याचा आनंद आणि समाधान आहे. मागील काळात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विक्रमी वेळेत पुन्हा प्रस्थापित करु असा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या याच पुतळ्याचे आज पूजन केले, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले, कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वादळे येतात. या वादळांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करुन, त्यापेक्षाही अधिक इंटेन्सिटीचे वादळ आले तरी पुतळा उभा राहू शकेल, अशी रचना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशामधील बहुधा हा सर्वात उंच पुतळा असू शकेल. या पुतळ्याची उंची ६० फूट, तलवारीसह उंची ८३ फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची ९३ फूट इतकी आहे. किमान १०० वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल इतकी मजबुती या पुतळ्याची आहे. पुतळा उभारणाऱ्यांकडेच त्याच्या देखभालीचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा :
जम्मू-कश्मीरमध्ये शस्त्रसंधीनंतर लोकांना दिलासा
भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीबाबत बांगलादेशाचे विधान, काय म्हणाले युनुस!
भारताने पाकिस्तानात घुसून हल्ले केल्याचे जगाने पाहिलंय!
या परिसरातील उपलब्ध होणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करुन व्यवस्था उभ्या करण्यात येणार आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वराज्याचा अनुभव यावा, येथील भव्यता पाहता यावी, अशाप्रकारे या परिसराचा विकास करण्यात येणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाद्वारे कोकणाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, युगपुरुष आणि भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचा केंद्रबिंदू — किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात आलेल्या त्यांच्या तलवारधारी भव्य पुतळ्याची माहिती सांगणारा विशेष व्हिडिओ…@Dev_Fadnavis… pic.twitter.com/rlwdzhZrXY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 11, 2025







