31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषआजपासून 'या' नियमांमध्ये होणार बदल

आजपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर निश्चित करतात.

Google News Follow

Related

आजपासून नवीन महिना सुरु झाला असून, नवीन महिन्यासोबत अनेक मोठे बदलही होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडरच्या किमतीपासून ते विमा दाव्यांसंबंधीचे नियमही बदलणार आहेत. यासोबत रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेऊन नवीन दर निश्चित करतात.  प्रत्येक महिन्याचा पहिल्या दिवशी १४ किलो घरगुती सिलिंडर आणि १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींचे संशोधन करतात . त्यानुसार,आजपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये इंडेनच्या १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ११५.५ रुपये, कोलकाता ११३ रुपये, तसेच चेन्नईमध्ये ११६.५ रुपयांनी स्वस्त होणार आहे. सलग सहाव्या महिन्यांत व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत. परंतु घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किंमतीतच उपलब्ध असणार आहे.

तसेच गॅस सिलिंडरच्या घरपोच सेवेसाठी वन टाइम पासवर्ड किंवा ओटीपी आवश्यक असणार आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर, ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी सांगितल्यानंतरचं  सिलेंडरची सेवा दिली जाणार आहे.

जीएसटी संबंधित नियमांमध्येसुद्धा बदल होणार आहेत. आता पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना जीएसटी रिटर्नमध्ये पाच अंकी एचएसएन कोड टाकावा लागणार आहे. यापूर्वी दोन अंकी एचएसएन कोड टाकावा लागायचा. यासोबतच आयआरडीए सुद्धा मोठ्या बदलांची घोषणा करू शकते. विमाधारकांना आजपासून केवायसी तपशील देणे बंधनकारक केले जाऊ शकते.

तसेच आजचा होणारा महत्वाचा बदल म्हणजे, कारमध्ये बसलेल्या सहप्रवाशांनासुद्धा सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

फडणवीसांच्या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरेंकडून पुरावे नाहीतच

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

रेल्वेच्या वेळापत्रकातही मोठे बदल होणार आहेत. कोकण रेल्वेसह भारतातील महत्त्वांच्या गाड्यांच्या वेळेत आजपासून बदल होणार आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांसह सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा