26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषही एक वेब संस्कृती, सर्जनशीलतेची

ही एक वेब संस्कृती, सर्जनशीलतेची

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रथम जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन (वेव्स) चे उद्घाटन केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मुंबईत १०० हून अधिक देशांतील कलाकार, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. एका अर्थाने, आज येथे जागतिक प्रतिभा आणि जागतिक सर्जनशीलतेच्या ईको-सिस्टमची पायाभरणी होत आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले – ‘‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच ‘वेव्स’… ही केवळ एक संक्षिप्त रूप (ऐक्रोनिम) नाही. ही एक वेब आहे – संस्कृतीची, सर्जनशीलतेची. वेव्स हे एक असे जागतिक व्यासपीठ आहे, जे प्रत्येक कलाकाराचे, प्रत्येक निर्मात्याचे आहे. येथे प्रत्येक कलाकार, प्रत्येक तरुण नवीन कल्पनांसह सर्जनशील जगाशी जोडला जाईल. आज १ मे आहे. आजपासून ११२ वर्षांपूर्वी, ३ मे १९१३ रोजी भारतातील पहिली फीचर फिल्म ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाली होती. या चित्रपटाचे निर्माते दादासाहेब फाळके होते आणि कालच त्यांची जयंती होती. गेल्या एका शतकात भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवण्यात यश मिळवले आहे.’’

हेही वाचा..

पहलगाममध्ये एनआयएचे डीजी सदानंद दाते दाखल

पहलगाम हल्ल्यानंतर तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान काय म्हणाले?

भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखाला महत्त्वाची भूमिका!

तहव्वुर राणाचे आवाजाचे आणि हस्तलिखिताचे नमुने घेणार

आपल्या भाषणात त्यांनी पुढे सांगितले – ‘‘आज ‘वेव्स’ या मंचावर आपण भारतीय सिनेमातील अनेक दिग्गजांना टपाल तिकिटांच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी गेमिंग जगतातील लोकांशी, संगीत क्षेत्रातील लोकांशी, चित्रपट निर्मात्यांशी आणि पडद्यावर झळकणाऱ्या चेहऱ्यांशी संवाद साधला. या चर्चांमध्ये भारताची सर्जनशीलता, निर्मितीक्षमता आणि जागतिक सहकार्य यावर चर्चा होत असे. लाल किल्ल्यावरून मी ‘सबका प्रयास’ या संकल्पनेची मांडणी केली होती. आज मला विश्वास वाटतो की, आपणा सर्वांच्या प्रयत्नांनी ‘वेव्स’ आगामी काळात नवीन उंची गाठेल.’’

वेव्स समिट २०२५ दरम्यान, पंतप्रधान मोदींनी भारतीय चित्रपटसृष्टीतील ५ दिग्गज कलाकारांवर – गुरु दत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलिल चौधरी – यांच्यावर आधारित स्मारक टपाल तिकिटांचे प्रकाशनही केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा