‘कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका भाजपसाठी प्रचार करण्याची बातमी खोटी!

भाजपा नेते अमित मालवीय दिली माहिती 

‘कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका भाजपसाठी प्रचार करण्याची बातमी खोटी!

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये काही असेही व्हिडीओ, फोटो असताना जे खोटे असतात. तसेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. असाच एक फोटो व्हायरल होत, ज्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका भाजपसाठी प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे. तथापि, भाजपने ते नाकारले आहे आणि ते बनावट असल्याचे म्हटले आहे.

खरंतर, टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टच्या कटिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, विंग कमांडर व्योमिका कर्नल सोफिया कुरेशी भाजपच्या प्रचाराचा चेहरा असतील. त्यात असे म्हटले आहे की,  ‘ऑपरेशन सिंदूर’ वरील पत्रकार परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १९ जून रोजी भाजपा सुरू करणार असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘महिला-केंद्रित मोहिमे’चा चेहरा असतील.

दरम्यान, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांच्या नावाने व्हायरल होत असलेला फोटो खोटा असल्याचे भाजपा म्हटले आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी ट्वीटकरत म्हटले, ही बातमी फेक आहे. कर्नल सोफिया कुरेशी किंवा विंग कमांडर व्योमिका सिंग यांना प्रचाराचा चेहरा बनवण्याची भाजपची कोणतीही योजना नाही. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केलेल्या टिप्पण्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना समाजातील एका मजबूत मुस्लिम महिलेचे उदाहरण म्हणून अधोरेखित करण्याबद्दल मर्यादित टिप्पणी केली होती.

हे ही वाचा : 

राऊत यांच्यासारखा वेडा इसम काय बोलतो याकडे कशाला लक्ष द्यायचे?

खडगेंनी राफेलची नाही, काँग्रेसची चिंता करावी!

माओवादी नेता देवजीला त्याच्या नातीने पत्र लिहून कळवलं, “हत्यारं खाली ठेवा, घरी परत या”

दहशतवादी हाफिज सईदसोबत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसुरी!

Exit mobile version