भाजपावर टीका करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पलटवार करत टीका केली आहे. देशाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला असून देशवासीय आनंदात आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारखा वेडा इसम काय बोलतो याला कुणीही महत्त्व देत नाही, असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
पहलगाम हल्ल्याविरुद्ध भारताने केलेल्या कारवाईचा डंका देशासह जगभरात वाजत आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे मोदी सरकारचे कौतुक होत आहे. मोदी सरकारने हल्ल्याचा बदला घेतल्यामुळे या घटनेतील पिडीत कुटुंबांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेमुळे सत्ताधारी नेत्यांकडून याचा उल्लेख केला जात आहे. दरम्यान, भाजपाच्या या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. ‘वन नेशन वन हसबंड’ मोहीम भाजपाने सुरु केली आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, राऊतांच्या टीकेला आमदार अतुल भातखळकरांनी प्रत्युतर दिले आहे.
संजय राऊतांना वेड लागले आहे. त्याकडे काय लक्ष द्यायचे. वन नेशन वन हसबंड असे काहीतरी संजय राऊत म्हणत आहे. त्याचा अर्थ काय?, भ्रष्टाचारामुळे तुरुंगवास भोगलेल्या माणसाच्या विधानांवर काहीही प्रतिक्रिया दिली पाहिजे, असं वाटत नाही, असे भातखळकर म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, सध्या देश आनंदात आहे. देशाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्यांच्या भ्याड हल्ल्याचा बदल घेतला आहे. देशाकडे जगभरात गौरवाने, अभिमानाने बघितले जात आहे. देशवासीय आनंदात आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारखा वेडा इसम काय बोलतो याला कुणीही महत्त्व देत नाही.
हे ही वाचा :
खडगेंनी राफेलची नाही, काँग्रेसची चिंता करावी!
माओवादी नेता देवजीला त्याच्या नातीने पत्र लिहून कळवलं, “हत्यारं खाली ठेवा, घरी परत या”
पाकिस्तानातील तुरुंगात दहशतवाद्याला बाप होण्याचीही सोय!
दहशतवादी हाफिज सईदसोबत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसुरी!
दरम्यान, संजय राऊत म्हणाले होते की, भाजपा घरोघरी आता सिंदूर घेऊन जात आहे. देशात वन नेशन वन हसबंड अशी मोहीम राबवली जातेय का?. सिंदूर फक्त पतीच आपल्या पत्नीला देत असतो. एखादी बाहेरची व्यक्ती घरी जाऊन अन्य महिलेला सिंदूर देत नाही. हा तुमचा कोणता जिहाद?. जसे ‘वन नेशन वन इलेक्शन’ आहे तसे भाजपाचे हे ‘वन नेशन वन हसबंड’ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
