पाकिस्तानमधून लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचा एक नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोत हाफिज सईदसोबत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसुरी देखील दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी पाक मधील एका राजकीय रॅलीत तो दिसून आला होता.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने मुरीदके येथील हाफिजचे मुख्यालय उडवून दिले, परंतु हाफिज बचावला. आता तो सैफुल्लाह कसुरीसोबत फोटोत दिसत आहे. हा फोटो कधीचा आहे, कोणी काढला, याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र, दोघांच्या एकत्र येण्याने चर्चेला उधाण आले आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी भारताच्या कारवाईमुळे निराश झाले आहेत हे निश्चित. कारण भारताची कारवाई अजूनही सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे भारतातून कधी आणि कुठून क्षेपणास्त्र येईल आणि आपला खात्मा होईल, अशी भीती दहशतवाद्यांमध्ये आहे. दुसरीकडे, दहशतवादी सैफुल्लाह कसुरीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये सैफुल्लाह कसुरी सशस्त्र लष्कर अंगरक्षकांसह दिसला. लोक त्याचे फुलांनी स्वागत करत असल्याचेही त्यामध्ये दिसून आले.
हे ही वाचा :
सिंधू पाणी करारावरून भारताला दोष देणे थांबवा!
शेअर बाजार विश्लेषणाचा चेहरा बदलणारा चेहरा
महिलांच्या शौचालयात व्हिडीओ बनविणाऱ्या एकाला अटक!
ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा कहर, २५ जणांचा मृत्यू!
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात उघडपणे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ५ दिवसांपासून लष्कर-ए-तैयबा, जमात-उद-दावा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांचे दहशतवादी पाकिस्तानमध्ये मिरवणुका काढत आहेत. दहशतवादी संघटनांच्या या कार्यक्रमांमध्ये पाकिस्तानचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होत आहेत.
२८ मे रोजी सैफुल्लाह कसुरी सार्वजनिक ठिकाणी दिसून आला होता. पाकिस्तानच्या अणुचाचण्यांच्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगने (पीएमएमएल) आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये तो व्यासपीठावर दिसला. या रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषणे आणि भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. उपस्थितांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद देखील होता. तो रॅलीत म्हणाला, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा मला दोष देण्यात आला आहे आणि मी जगभर प्रसिद्ध झालो आहे.
