28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषपंतप्रधान मोदींकडून मेलोनी यांना ‘मेलोडी’ची भेट

पंतप्रधान मोदींकडून मेलोनी यांना ‘मेलोडी’ची भेट

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी शेअर केला व्हिडीओ

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इटली दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या इटालियन समकक्ष, जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या भेटीचे, चर्चांचे, कार डिप्लोमसी असे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये, विशेषतः जी२० शिखर परिषद आणि दुबईतील सीओपी२८ मध्ये, दोन्ही नेते संवाद साधताना दिसल्यानंतर या नेत्यांना एकत्रपणे #Melodi असे टोपणनाव सोशल मीडियावर देण्यात आले होते. याचाच संदर्भ घेत पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना एक खास भेट दिली आहे.

दोन्ही नेत्यांमधील उच्चस्तरीय राजनैतिक भेटीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफीचा एक पॅक भेट दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्या इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांना, दोन्ही नेत्यांना “मेलोडी” (मेलोनी+मोदी) म्हणण्याच्या इंटरनेटवरील चर्चांना प्रत्युत्तर म्हणून पार्लेच्या ‘मेलोडी’ टॉफी भेट दिल्या.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींना ‘गारुडी’ दाखवून नॉर्वेच्या वृत्तपत्राने ओलांडल्या मर्यादा

मिर्झापूरमध्ये ‘जिम जिहाद’ प्रकरणात इमरान खानसह १० आरोपींवर गँगस्टर ऍक्ट लागू

हरियाणातील नूंहमध्ये रुग्णवाहिकेतून सुरू होती गो-तस्करी

बांगलादेशातील दूतावासात भारतीय अधिकाऱ्याचा आढळला मृतदेह

यापूर्वी २०२३ मध्ये मेलोनी यांनी पोस्ट केलेला एक सेल्फी व्हिडिओ, ज्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना “सर्वात प्रिय नेते” म्हटले होते, तो व्हायरल झाला आणि त्यामुळे ऑनलाइन #Melodi या हॅशटॅगला आणखी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या इटली दौऱ्यादरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी ऐतिहासिक कोलोसियम येथे एका छायाचित्रासह त्यांचे रोममध्ये स्वागत केले. जॉर्जिया मेलोनी यांनी रोममधील कोलोसियमच्या स्टँड्समधून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यांना “माझा मित्र” असे संबोधले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा