28.2 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींना ‘गारुडी’ दाखवून नॉर्वेच्या वृत्तपत्राने ओलांडल्या मर्यादा

पंतप्रधान मोदींना ‘गारुडी’ दाखवून नॉर्वेच्या वृत्तपत्राने ओलांडल्या मर्यादा

आफ्टेनपोस्टेन वृत्तपत्रावर टीकेची झोड

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नॉर्वेच्या दौऱ्यावर असताना ‘भारतामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप होत असताना भारतावर विश्वास का ठेवावा,’ असा प्रश्न पत्रकार हेले लेंग स्वेन्सेन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत विचारला होता. यावरून मोठा वाद निर्माण झालेला असतानाच नॉर्वेमधील प्रमुख वृत्तपत्र ‘आफ्टेनपोस्टेन’ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘गारुडी’ म्हणून चित्रण करणारे एक आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी व्यंगचित्र प्रसिद्ध केले. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असून पाश्चात्य देशांमधील जुन्या पूर्वग्रहांचे समर्थन होत असल्याचे आरोप केले जात आहेत.

युरोपीय देशाच्या दौऱ्यादरम्यान एका पत्रकाराने पंतप्रधानांना विचारलेल्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या वादानंतर हे व्यंगचित्र समोर आले आहे. या कार्टूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गारुडी म्हणून दाखवण्यात आले असून पेट्रोल पंपाच्या पाइपला सापाचे रूप देण्यात आले होते. हे चित्र “एक चलाख आणि थोडासा अस्वस्थ करणारा माणूस” या शीर्षकाच्या मतलेखासोबत प्रकाशित करण्यात आले आहे.

हा वाद पंतप्रधान मोदींच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर समोर आला. या परिषदेत नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग यांनी नरेंद्र मोदी पत्रकारांचे प्रश्न घेत नसल्याबद्दल टिप्पणी केली होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आवाज देत विचारले, “तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रसारमाध्यमांकडून काही प्रश्न का घेत नाही?” मात्र, पीएम मोदींनी हा प्रश्न ऐकला किंवा त्यावर प्रतिक्रिया दिल्याचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. यानंतर प्रसिद्ध झालेल्या कार्टूनमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हे कार्टून वांशिक आणि वसाहतवादी मानसिकतेतून प्रेरित असल्याचे म्हटले.

टीकाकारांच्या मते, या चित्रातून भारताला “साप खेळवणाऱ्यांचा देश” अशा जुनाट पाश्चिमात्य प्रतिमेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका वापरकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “ही पत्रकारिता नाही. हा वसाहतवादी काळातील वांशिक दृष्टिकोन आहे, जो कार्टूनच्या रूपात दाखवला गेला आहे. भारताची प्रगती त्यांना सहन होत नाही, म्हणून ते जुन्याच घिसेपिट्या प्रतिमांचा आधार घेत आहेत.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “हे कार्टून स्पष्टपणे वांशिक आहे. पंतप्रधान मोदी पूर्वी म्हणायचे की जग भारताकडे ‘साप खेळवणाऱ्यांचा देश’ म्हणून पाहत होते. आता ओस्लो दौऱ्यादरम्यान एका मोठ्या युरोपीय वृत्तपत्राने त्यांना तस्सेच दाखवले आहे.” सोशल मीडियावर अनेकांनी याला भारत आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधानांचा अपमान म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “युरोपीय लोक अजूनही त्यांच्या वसाहतवादी कल्पनांमधून बाहेर आलेले नाहीत.”

हे ही वाचा:

मिर्झापूरमध्ये ‘जिम जिहाद’ प्रकरणात इमरान खानसह १० आरोपींवर गँगस्टर ऍक्ट लागू

हरियाणातील नूंहमध्ये रुग्णवाहिकेतून सुरू होती गो-तस्करी

बांगलादेशातील दूतावासात भारतीय अधिकाऱ्याचा आढळला मृतदेह

कारमधून प्रवास, रात्रीचे जेवण, कोलोसियममध्ये सेल्फी; पंतप्रधान मोदींचा इटली दौरा

भारताबाबत अशी प्रतिमा समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्येही एका स्पॅनिश वृत्तपत्राने भारताच्या वाढत्या आर्थिक ताकदीवरील रिपोर्टमध्ये “साप खेळवणाऱ्यांची” प्रतिमा वापरल्याने वाद निर्माण झाला होता. पंतप्रधान मोदी यांनीही अनेक जागतिक व्यासपीठांवर या विषयाचा उल्लेख केला आहे. २०१४ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे दिलेल्या भाषणात त्यांनी म्हटले होते की, जग पूर्वी भारताकडे “साप खेळवणाऱ्यांचा देश” म्हणून पाहत होते, मात्र आता भारत “माऊस चार्मर्स” म्हणजे तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि डिजिटल शक्ती म्हणून ओळखला जात आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सीबी जॉर्ज यांनी भारताच्या लोकशाही आणि प्रसारमाध्यम व्यवस्थेचे समर्थन केले. ते म्हणाले, “भारतामध्ये दररोज किती बातम्या येतात हे तुम्हाला माहिती आहे. फक्त दिल्लीमध्येच इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांतील किमान २०० टीव्ही चॅनेल्स आहेत. लोकांना भारताच्या व्यापकतेची कल्पनाच नाही.” मानवाधिकार आणि प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील प्रश्नांबाबत ते म्हणाले, “भारताचे टीकाकार काही अज्ञानी स्वयंसेवी संस्थांच्या अहवालांवर आधारित प्रश्न विचारतात.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा