30.5 C
Mumbai
Wednesday, May 20, 2026
घरराजकारणपत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नाहीत, याची नॉर्वेच्या पत्रकाराला आधीच माहिती होती!

पत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नाहीत, याची नॉर्वेच्या पत्रकाराला आधीच माहिती होती!

मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला हॅले लिंग यांनी दिले उत्तर

Google News Follow

Related

गेल्या दोन दिवसांत भारतातील मोदीविरोधी गटासाठी एक नवीन ‘हिरो’ म्हणून समोर आलेल्या नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग, यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांच्या संयुक्त ब्रिफिंगदरम्यान पत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नाहीत, याची आधीच माहिती देण्यात आली होती.

बीबीसीशी बोलताना हेले लिंग म्हणाल्या, “नाही, नाही. मला पूर्ण माहिती होती की ही एक प्रेस ब्रिफिंग होती आणि दोन्ही नेते कोणतेही प्रश्न घेणार नव्हते.”

यानंतर लिंग यांनी पत्रकारापासून ‘आंदोलनकर्ती’ बनण्याचे समर्थन करत म्हटले, “यामुळे पत्रकार म्हणून माझे काम आणखी महत्त्वाचे बनते, कारण आपण परदेशी नेत्यांना येथे येऊन लोकशाहीची व्याख्या काय आहे, हे आपल्या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीला प्रश्न न विचारता ठरवू देऊ शकत नाही.”

बीबीसी हिंदीच्या पत्रकाराने पुन्हा विचारले की, भारतीय आणि नॉर्वेजियन पंतप्रधान पत्रकारांचे प्रश्न घेणार नाहीत, याची माहिती पत्रकारांना आधी देण्यात आली होती का? त्यावर लिंग म्हणाल्या, “ते नियोजित नव्हते. त्या संकल्पनेलाच मी प्रश्न विचारते.”

भारतामधील कथित मानवाधिकार उल्लंघनांबाबतच्या पक्षपाती दाव्यांबद्दलही त्यांनी स्वतःची भूमिका उघड केली. या संदर्भात त्यांनी अम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्यूमन राइट वॉच यांसारख्या भारतविरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थांना आपले मुख्य माहिती स्रोत असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींना ‘गारुडी’ दाखवून नॉर्वेच्या वृत्तपत्राने ओलांडल्या मर्यादा

हरियाणातील नूंहमध्ये रुग्णवाहिकेतून सुरू होती गो-तस्करी

मोदींवरच्या ट्विटनतर हेले लिंगचे फॉलोअर्स वाढले

‘योग अपनवा, निरोगी राहा’ ; मेरी कोम दररोज योग करून स्वतःला ठेवतात फिट

कमी परिचित असलेल्या डागसाविसेन या मीडिया संस्थेशी संबंधित लिंग यांचे एक्सवरील फॉलोअर्स फक्त ८०० च्या आसपास होते आणि त्यांचे खाते जवळपास निष्क्रिय होते. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांची शेवटची पोस्ट एप्रिल २०२४ मधील होती.

नंतर हे स्पष्ट झाले की ती पत्रकार परिषद नव्हती, तर संयुक्त निवेदन होते. भारतीय किंवा नॉर्वेजियन पंतप्रधानांनी प्रश्न घ्यायचे नव्हते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या पॅनेलने पत्रकारांचे प्रश्न घेतले.

पंतप्रधान मोदी निवेदन करून व्यासपीठावरून खाली उतरत असताना, लिंग यांनी विचारले, “पंतप्रधान मोदी, जगातील सर्वात मुक्त प्रसारमाध्यमांकडून काही प्रश्न का घेत नाही?” पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले नाही आणि आपल्या समकक्षासोबत निघून गेले. नेमके हेच लिंग यांना अपेक्षित होते. त्यांनी म्हटले, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा प्रश्न घेतला नाही. मला त्याची अपेक्षाही नव्हती.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा