सार्वजनिक शौचालयात मोबाईल कॅमेरात महिलांचे व्हिडीओ तयार करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथे घडला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करीत होता.
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथे असलेल्या सार्वजनिक महिलांच्या शौचालयात एक व्यक्ती दररोज सायंकाळच्या वेळी मोबाईल कॅमेरात महिलांचे व्हिडीओ बनवत असल्याची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याला मिळाली होती.
लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या कामी दोन महिला पोलिसांची व्हिडीओ बनविणाऱ्याला पकडण्यासाठी नेमणूक करण्यात आली.दरम्यान महिला पोलिसांनी सार्वजनिक महिलांच्या शौचालया जवळ पाळत ठेवण्यात आली.
पुरुष शौचालयात एक इसम संशयास्पद हालचाली करीत असल्याचे आढळून आले असता,पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील मोबाईल फोन तपासला असता पोलिसांना त्याच्या मोबाईल फोन मध्ये अनेक महिलांचे वेगवेगळे अश्लील व्हिडीओ आढळुन आले.
हे ही वाचा :
वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला मुंबई पोलिसांकडून अटक!
ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा कहर, २५ जणांचा मृत्यू!
चौथ्या आर्थिक तिमाहीवर ‘महाकुंभ कृपा’?
ठाकरेंची हिरवी सेना, राहुल गांधी किंवा आझमी असो, अनधिकृत मस्जिद-भोंगे खाली येणारच!
राजनकुमार प्रमोद चौपाल (१९) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.राजनकुमार हा एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता, त्याच्या मोबाईल मध्ये अनेक अश्लील व्हिडीओ मिळून आले आहे.लोकमान्य टिळक मार्ग राजकुमार चौपाल विरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ७७ आणि पोक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
