राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात भाजपाचे माजी खासदार आणि जेष्ठ नेते किरीट सोमय्या वारंवार आवाज उठवत आहेत. घुसखोर बांगलादेशी-रोहिंगे यांच्या विरोधासह त्यांची मशिदींवरील अनधिकृत भोंग्या विरोधातही मोहीम सुरु आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी भेट देवून त्यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवले आहेत, उतरवत आहेत.
किरीट सोमय्या यांच्या या मोहिमेवरून काही मुस्लीम लोक त्यांच्यावर टीका-टिप्पणी करत आहेत. यापूर्वी काही कट्टरवाद्यांकडून त्यांना धमकीही देण्यात आली होती. मात्र, अशा फुसक्या धमक्यांना न जुमानता सोमय्या यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (३१ मे) मुंबईतील चेंबूरच्या आर.सी.एफ पोलीस स्टेशनच्या भेटी दरम्यान त्यांच्याविरुद्ध मुस्लीम संघटनांना आक्रमक झाल्या आणि त्यांच्याविरुद्ध आंदोलन केले. मात्र, कोणी कितीही विरोध केला, धमक्या दिल्या तरी अनधिकृत मस्जिद-भोंगे खाली उतरणारच, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
‘भोंगा मुक्त मुंबई’ अभियानांतर्गत सोमय्या यांनी ट्रॉम्बे पोलीस स्टेशन (चीता कॅम्प, सायन-ट्रॉम्बे रोड), गोवंडी पोलीस स्टेशन (व्ही. एन. पुरव मार्ग, देवनार) आणि आर.सी.एफ पोलीस स्टेशन (आर.सी. मार्ग, चेंबूर) या ठिकाणी भेट दिल्या. आर.सी.एफ पोलीस स्टेशनच्या भेटीदरम्यान सोमय्या यांच्या विरोधात मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या.
सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कारवाई करत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे आम्हाला कोणीही आडवू शकत नाही अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली.
हे ही वाचा :
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री महिला; पण अत्याचार महिलांवर सर्वाधिक
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बारव का बांधले?
इस्रायलने हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मोहम्मद अली जमौलला केले ठार!
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले, अनधिकृत भोंगे काढताना पोलीस किरीट सोमय्या यांना थांबवू शकत नाहीत. अशा धमक्या देणारेही खूप येवून गेले, धमक्यांना घाबरणार नाही. आता अनधिकृत भोंगे चालणार नाही, दादागिरी, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहाद पण होवू देणार नाही. तुमच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी झाल्याचे विचारले असता, ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची हिरवी सेना असो, राहुल गांधी किंवा अबू आझमी असो कोणाचेही चालणार नाही अनधिकृत मस्जिद-भोंगे खाली येणारच.
