पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात यशस्वी झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेवर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “विरोधकांना हा सततचा भीतीचा भास आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना ते पुन्हा सत्तेत येऊ शकत नाहीत.”
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या विधानावर टीका करताना त्यांनी म्हटलं, “खडगे हे ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांनी जी टिप्पणी केली ती अतिशय बालिश होती. विरोधक मोदीविरोधात इतके बुडाले आहेत की, आता ते भारतातील सैन्याच्या पराक्रमावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांना भारतातील शौर्याच्या बाजूने उभं राहायला हवं, भारताच्या विरोधात नाही.
हे ही वाचा:
ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा कहर, २५ जणांचा मृत्यू!
शेअर बाजार विश्लेषणाचा चेहरा बदलणारा चेहरा
चौथ्या आर्थिक तिमाहीवर ‘महाकुंभ कृपा’?
इस्रायलने हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मोहम्मद अली जमौलला केले ठार!
राफेल आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा सन्मान करा
आचार्य प्रमोद म्हणाले: राफेल हे भारताच्या गर्वाचं प्रतीक आहे. त्यावर विनोद करणं हे भारतीय सैन्याचा आणि देशाचा अपमान आहे. “विरोधक भारताच्या मुलींच्या ‘सिंदूरा’चा अपमान करत आहेत. पण जगभराने पाहिलं आहे की भारताच्या या सिंदूरमध्ये किती ताकद आहे. पाकिस्ताननेही हे अनुभवलं आहे. ऑपरेशन सिंदूर’ ने दाखवून दिलं की भारताची सेना आपल्या शत्रूंना कसं ठाम उत्तर देते.”
काँग्रेस मानसिक दिवाळखोरीत
“काँग्रेस आता मानसिक दिवाळखोरीच्या स्थितीत पोहचली आहे. त्यांना राफेलचं नाही, तर स्वतःच्या पक्षाचं भवितव्य जास्त काळजीचं कारण ठरायला हवं. काँग्रेसमध्ये काही ‘राहू-केतू’ आहेत जे पक्षाचं नुकसान करत आहेत. पण खडगे आणि राहुल गांधी यांना त्याचं भान नाही, असेही आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.
सीडीएस अनिल चौहान यांनी काही जेट्स पडली पण त्यापेक्षा ती कशी पडली याचा विचार होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य एका मुलाखतीत केल्यानंतर मोदी सरकारने देशाची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केला आहे.
