उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीरामाच्या नगरी अयोध्याला स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अयोध्या नगर निगमने योगी सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वाकांक्षी मास्टर प्लान तयार केला आहे, ज्याअंतर्गत इंटीग्रेटेड कंट्रोल कमांड सेंटर (ICCC) स्थापन केले जाणार आहे. योगी सरकारच्या योजना विभागाने या योजनेला मंजुरी दिली असून लवकरच ती प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी ५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अयोध्या आणि फैजाबाद येथे एकूण १,००० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरातील संवेदनशील आणि प्रमुख भागांत हे कॅमेरे लावले जातील, ज्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येईल आणि कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणखी बळकट होईल.
या उपक्रमांतर्गत सिव्हिल लाईन्स परिसरात अयोध्या नगर निगम आणि अयोध्या विकास प्राधिकरण (ADA) यांच्या संयुक्त कार्यालयात एक अत्याधुनिक कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे. ही कंट्रोल रूम केवळ सुरक्षा सुनिश्चित करणार नाही, तर जलसाचंती, बंद स्ट्रीट लाईट्स आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवरही तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करेल. अयोध्येत यापूर्वीच सेफ सिटी प्रकल्पांतर्गत १,३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे अमानीगंज येथील जलकल कार्यालयातील ITMS प्रणालीशी जोडण्यात आले आहेत.
हेही वाचा..
पुतीन यांची इच्छा, ट्रम्प यांची करणी भारत-चीन यांची हातमिळवणी
“विश्वासाधारित शासना”मुळे अर्थव्यवस्था शिखर गाठू शकते
कोण लोकशाहीत ‘राजा’ बनण्याचा प्रयत्न करतोय
एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७० वर!
यामध्ये खाजगी घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील कॅमेरेही समाविष्ट आहेत. या योजनेचंही उद्दिष्ट अयोध्येच्या सुरक्षेला अधिक बळकट करणं आहे. नगर निगमच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पुनीत ओझा यांनी सांगितले की, शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पावर जलद गतीने काम सुरू होईल. ही योजना केवळ अयोध्येला सुरक्षित आणि स्मार्ट शहर बनवण्यात मदत करणार नाही, तर नागरिकांना उत्तम सुविधा देण्याबाबत योगी सरकारच्या कटिबद्धतेचं प्रतीक देखील असेल.







