27 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरविशेषमालेगावच्या उपमहापौरांनी लावला टिपू सुलतानाचा फोटो, वादानंतर हटवला

मालेगावच्या उपमहापौरांनी लावला टिपू सुलतानाचा फोटो, वादानंतर हटवला

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध

Google News Follow

Related

टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध युद्ध लढले याचा दाखला देत त्याला स्वातंत्र्यसैनिक मानणाऱ्यांची महाराष्ट्रात संख्या कमी नाही. मालेगावातील महानगरपालिकेत इस्लाम पार्टीची सत्ता आली आहे. तर समाजवादी पक्षाच्या महिला नगरसेविका शान ए हिंद निहाल अहमद या उपमहापौरांनी आपल्या कक्षातील भिंतीवर टिपू सुलतानाची तस्बीर लावली. त्याचे पडसाद उमटले आणि शिवसेनेने (एकनाथ शिंदे) त्याविरोधात जोरदार टीका केली आणि आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर ती तस्बीर काढण्यात आली असली तरी उपमहापौरांनी टिपू सुलतानचे समर्थन केले आहे.

मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यांना तो फोटो भेट दिल्याचे त्यांचे म्हणणे होते. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला.  शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना या झाल्याप्रकाराची माहिती निवेदनाच्या माध्यमातून दिली. जोपर्यंत उपमहापौरांच्या दालनातून हा फोटो हटवला जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा या लोकप्रतिनिधींनी घेतल्यानंतर तो फोटो हटविण्यात आला.

हे ही वाचा:

तारिक रहमान यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींना मिळणार आमंत्रण?

निशिकांत दुबे यांनी दिले राहुल गांधींना खुल्या चर्चेचे आव्हान

गुलामगिरीचे अवशेष पुसून टाकण्यासाठी ‘सेवा तीर्थ’

इंडिगो १००० पायलट्सची करणार नियुक्ती

फोटो काढला नाही, तर सध्या सुरू असलेली निदर्शने तीव्र आंदोलनात रूपांतरित होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, उपमहापौर शान ए हिंद यांनी म्हटलंय की, टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपाच्या एका खासदारानेही टिपू सुलतान यांचे योगदान मान्य केल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र सरकारच्या एका अधिसूचनेचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, विरोध करणारे हे लोक नेमके कोण आहेत? टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याबाबतही त्यांनी ठाम मतं मांडली आहेत.

यावर आता सत्ताधारी इस्लाम पार्टी या संवेदनशील मुद्द्यावर आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा