तिरुमला तिरुपती देवस्थानमने (TTD) आपला एक अधिकारी ए राजशेखर बाबू यांना निलंबित केले आहे. या अधिकाऱ्यावर चर्चमध्ये प्रार्थना केल्याचा आरोप आहे. देवस्थान कमिटीने ट्विटकरत कारवाईची माहिती दिली. दरम्यान, यापूर्वी तिरुमला तिरुपती देवस्थानमने हिंदू परंपरांचे पालन न केल्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत अनेकांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
टीटीडीने कारवाईची माहिती देत म्हटले, टीटीडीचे सहाय्यक ईओ राजशेखर बाबू यांना निलंबित करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राजशेखर बाबू हे दर रविवारी त्यांच्या मूळ गावी पुत्तूर येथे जात असत आणि गावातील चर्चेमध्ये प्रार्थनेला उपस्थित राहत असत.
जेव्हा टीटीडीला हे कळले तेव्हा त्यांची चौकशी करण्यात आली आणि चौकशीनंतर आरोप खरे असल्याचे आढळून आले. त्यानंतर राजशेखर बाबू यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. टीटीडी दक्षता विभागाच्या अहवालाचा आणि पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कमिटीने सांगितले. टीटीडीने म्हटले आहे की, हिंदू धार्मिक संस्थेचा कर्मचारी म्हणून हे टीटीडीच्या नियमांचे उल्लंघन आहे.
हे ही वाचा :
अभिनेत्री अरुणा यांच्या घरी ईडीचा छापा
गुजरात पुल दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू
तहव्वुर राणाची कोठडी १३ ऑगस्टपर्यंत वाढवली
छांगुर बाबा प्रकरणात ईडीकडून तपास
दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये, टीटीडीने १८ कर्मचाऱ्यांवर अशीच कारवाई केली होती. या कर्मचाऱ्यांवर गैर-हिंदू धार्मिक कार्यात सहभागी असल्याचा आरोप होता. अध्यक्ष बी.आर.नायडू यांच्या नेतृत्वाखालील TTD बोर्डाने सांगितले होते की TTD मध्ये फक्त हिंदू कर्मचारी काम करू शकतात.
TTD AEO Rajasekhar Babu suspended for violating conduct rules.
He allegedly took part in Sunday church prayers in Puttur, breaching TTD’s code as an employee of a Hindu religious body.Action was taken after a Vigilance report.#TTD #Tirumala #DisciplinaryAction pic.twitter.com/oJ4ymfRoJ5
— Tirumala Tirupati Devasthanams (@TTDevasthanams) July 8, 2025







