27 C
Mumbai
Monday, January 5, 2026
घरविशेषपुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Google News Follow

Related

राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आज ४१४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील ५५,७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा ते बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन,एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल,उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन,ग्रामसेवा प्रतिष्ठान,स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

भांडवलशाहीविरोधी कम्युनिस्ट नेत्याला ५० लाखांची मिनी कूपर पडली महागात

आंदोलक कुस्तीगीर मंगळवारी संध्याकाळी पदके गंगेत सोडणार

राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू

राज्यात शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७,८९७ ग्रामपंचायती मधील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे.सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी,अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात.

शासन अंगणवाड्याच्या बळकटीकरणासाठी अनेक योजना शासन राबवत आहे.अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत दि.४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध १५६ सामाजिक संस्थानी आतापर्यंत ४८६१ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. आज विपला फाऊंडेशनने पालघर,ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाणे मधील ३०,स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिक मधील १०, कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे मधील १६ अंगणवाड्या क्षमता वृध्दीसाठी दत्तक घेतल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा