उन्हाळाच्या दिवसात महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे जाणारा प्रवाशांचा ओघ बघता ही गर्दी विभागून कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणहून उत्तरेकडे जाण्यासाठी ज्यादाच्या दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेतर्फे सुरु करण्यात आलेल्या या दोन गाड्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरखपूर विशेष गाडी आणि पुणे ते हटिया विशेष गाडी अशा दोन गाड्यांचा समावेश आहे. या दोन्ही गाड्या या वन वे गाड्या असणार आहेत. ०१३५१ विशेष छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दिनांक ८ मे २०२१ रोजी सकाळी ११.०५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, नासिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, सतना, बांदा जंक्शन, कानपुर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती या स्थानकांवर थांबेल. या गाडीची रचना ही २ कोच ३ एसी, ५ स्लीपर आणि १४ सेकंड सीटिंग अशी असणार आहे.
हे ही वाचा:
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
अनिल देशमुखांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक
‘मुंबई पोलिस रश्मी शुक्लांना अटक करू शकत नाहीत’
इस्रायलकडून भारताला वैद्यकीय मदत
तर ०१४७९ पुणे-हटिया सुपरफास्ट विशेष गाडी दिनांक ८ मे २०२१ रोजी पुणे येथून रात्री १० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०४.५५ ला हटिया येथे पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, रायगढ, झारसुगुड़ा, रेंकेला या स्थानकांवर थांबेल. या गाडीची रचना दोन ३ टायर एसी , ८ स्लीपर, आणि ११ सेकंड सिटिंग अशी असणार आहे. या दोन्ही गाड्या पूर्णतः आरक्षित स्वरूपाच्या असणार आहेत. या गाडीचे आरक्षण www.irctc.co.in या संकेतस्थळावर ७ मे २०२१ रोजी सुरु होईल. या विशेष गाडीतून फक्त त्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे ज्यांचे तिकिट हे कन्फर्म असणार आहे.







