26 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषमुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोंडीने २ वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला बळी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोंडीने २ वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला बळी

चौथ्या मजल्यावरून पडल्याने झाला होता जखमी

Google News Follow

Related

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एका लहानग्याला वेळीच उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी घडली. या वाहतूक कोंडींमुळे या मुलाला रुग्णालयात वेळीच दाखल करता आले नाही आणि त्याला प्राणांना मुकावे लागले. अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला प्राण गमवावे लागल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीच्या या समस्येबद्दल लोक संतापही व्यक्त करत आहेत. अशा वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

 

वसई परिसरात ही घटना घडली आहे. पेल्हार परिसरात राहणारा रियान शेख (वय २) हा गुरुवारी दुपारी एका अपघातात चौथ्या मजल्यावरून खाली पडला होता. या अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा:

“अमेरिका पुन्हा बग्राम हवाई तळ ताब्यात घेऊ इच्छिते: ट्रम्प यांचा खुलासा!”

गरबा खेळायचाय? टीळा लावा, आरती करा; मुलींशी गैरवर्तन केलं तर थेट बुलडोझर!

अजमेरमध्ये आणखी एका बांगलादेशी घुसखोराला अटक!

सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला यशाचा मंत्र…

दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रियानला दुपारी अडीच वाजता रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे रवाना करण्यात आले. मात्र, त्या दिवशी मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीत रुग्णवाहिका तब्बल पाच तास अडकून राहिल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच रियानची प्रकृती ढासळली. कोंडीत अडकलेली रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नसल्याने, अखेर रियानच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्याच गावातील एका लहान रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

संतापाची लाट

 

या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. महामार्गावरील वाहतूक नियोजनातील त्रुटींबद्दल लोक संतप्त आहेत. या महामार्गावर २० ते २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पण प्रशासनाची कोणतीही ठोस कृती केली नाही, असा आरोप केला जात आहे.

स्थानिक आमदार स्नेहा दुबे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच वाहतूक कोंडीच्या समस्येबद्दल संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रस्ते खराब असल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी एक अधिसूचना जारी केली की, सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना ठाणे शहरात बंदी घातली. त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे. ही अधिसूचना मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा