29 C
Mumbai
Sunday, January 11, 2026
घरविशेष₹ ऐवजी टाइप केले $; बसला १६ लाखांचा फटका

₹ ऐवजी टाइप केले $; बसला १६ लाखांचा फटका

२० हजार रुपयांऐवजी पाठवले २० हजार डॉलर

Google News Follow

Related

केरळ विद्यापीठाच्या सेंटर फॉर लॅटिन अमेरिकन स्टडीजला त्यांच्या आर्थिक इतिहासातील सर्वात महागड्या ‘टायपो’ची किंमत मोजावी लागली आहे. ब्राझीलमधील एका पत्रकाराला ऑनलाइन व्याख्यानांसाठी मानधन पाठवताना बँकेतील कर्मचाऱ्याने “₹” ऐवजी चुकून “$” हे चिन्ह वापरल्याने ₹20 हजारांऐवजी थेट $20 हजार (सुमारे १६.५ लाख रुपये) पाठवले गेले.

संबंधित रक्कम २०२३ मध्ये चार ऑनलाइन व्याख्यानांसाठी मानधन म्हणून पाठवण्यात आली होती. मात्र अपेक्षित ₹20 हजारांच्या तुलनेत $20 हजार गेल्यामुळे विद्यापीठाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दुर्दैवाने, ही अतिरिक्त रक्कम परत मिळवण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. ही रक्कम अतिथी व्याख्याते मिलान सिमे मार्टिनिक यांच्या पत्नी कॅथलीन मार्टिनिक यांच्या खात्यात जमा झाली. ही चूक तिरुवनंतपुरममधील टेक्नोपार्क येथील एसबीआयच्या तेजस्विनी शाखेत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सेंटर फॉर लॅटिन अमेरिकन स्टडीजने ही बाब २०२४ मध्ये विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अतिथी व्याख्यात्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. “मार्टिनिक यांनी अतिरिक्त रक्कम विद्यापीठाच्या खात्यात परत जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी पैसे परत केल्याचा दावा केला असला तरी ती रक्कम विद्यापीठाच्या खात्यात कधीच जमा झाली नाही,” अशी माहिती केंद्राचे प्रमुख गिरीश कुमार यांनी दिली. या पत्रव्यवहारानंतर काही महिन्यांतच मार्टिनिक यांचे निधन झाले, त्यामुळे १५ जून २०२३ रोजी त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झालेली सुमारे १६.५ लाखांची अतिरिक्त रक्कम परत मिळण्याची शक्यता आणखी कमी झाली आहे.

हे ही वाचा..

अभिनेता विजयला सीबीआयकडून आले बोलावणे!

“राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय!”

‘वीबी जीरामजी’ योजनेमुळे खुश झाले मजूर

शास्त्रीय भाषांच्या संवर्धन, प्रसारासाठी ५४ दुर्मिळ प्रकाशने

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमासाठी या केंद्राला 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातीलच ही रक्कम १५ जून २०२३ रोजी कॅथलीन मार्टिनिक यांच्या सल्लागार समूहाच्या खात्यात पाठवण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी केंद्राने बँकिंग लोकपालाकडे तक्रार दाखल केली असून अद्यापही तोडगा निघालेला नाही. एसबीआयने आपली चूक मान्य करत विद्यापीठाकडून प्राप्तकर्त्याला अतिरिक्त रक्कम परत करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केल्याचे गिरीश कुमार यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा